अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर सुंदर नगर भागात शॉट सर्किटने घराला आग लागून कापूस,संगणक सह विविध वस्तू जळुन खाक झाल्याने सुमारे साडे तीन लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २९ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
सुंदरनगर भागातील उत्तमराव नथु बडगुजर यांच्या घरातील सर्व सदस्य मारवड येथे कपाशी वेचायला गेले होते सून घरी एकटीच होती घरातील दुसऱ्या मजल्यावर शॉट सर्किट होऊन त्या मजल्यावर ठेवलेल्या कापसाने पेट घेतला आग पसरून घरातील ९५ हजार रुपये किमतीचे तीन संगणक , १ लाख ४५ हजार रुपयांचे कॅमेरा व प्रिंटर,तसेच सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा ५ क्विंटल कापूस,कपाट खुर्ची,पलंग, धान्य व इतर ५५ हजार रुपये किमतीचे साहित्य असे एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.
आग विझवण्यासाठी सुंदर नगर भागातील संदीप अहिरराव, रघुनाथ कदम,व अग्निशामक दलाचे कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, नितीन खैरनार,आंनदा झिम्बल,फारुख शेख,मछिंद्र चौधरी,जाफर पठाण यांनी मदत केली ऍड दिनेश पाटील यांनी तहसीलदार प्रदीप पाटील यांना घटनेची माहिती कळवताच त्यांनी तलाठी गणेश महाजन यांना पाठवून पंचनामा केला.