लोंढवे विद्यालयातील दोन्ही विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीस ठरले पात्र

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयातील इ.८ वी चे दोन विद्यार्थी एन. एम.एम.एस.परीक्षेत  गुणवत्तायादीत चमकले आहेत. यामुळे ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. त्यांच्या यशाने विद्यालयाच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयातील शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तनिष्का श्रीकांत पाटील व प्राची सुनिल खैरनार यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सन २०२३-२४ पासून ५ वर्षापर्यंत प्रतिवर्षी १२,००० रु.प्रमाणे ६०,००० रू.शिष्यवृत्ती मिळणार. सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डाॅ.बी.एस पाटील, मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील, व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी कौतुक केले आहे.या विद्यार्थ्यांना समन्वयक शिक्षक महेश लालचंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *