अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील डांगरी व सात्री या गावातील वीस-पंचवीस महिलांनी सोमवारी डीवायएसपी रफिक शेख यांच्या कार्यालयात दारूबंदी व्हावी यासाठी एक अर्ज देऊन विनंती केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मारवड पोलिस पोलिस ठाणे हद्दीतील डांगरी येथील रहिवासी संगिता सुरेश कोळी यांनी उपविभागीय डीवायएसपी रफिक शेख यांच्या कार्यालयात दिलेल्या अर्जात दत्तू रामदास कोळी सुसाबाई अशोक कोळी, बाप्पू साहेबराव भोई, लक्ष्मण भादु वडार, भैया सिताराम वडर, शांताराम दोधु भिल, भगवान भादू कोळी, शाना धर्मा कोळी, दादा बंडू वडार, राजू नाईक भगत तसेच पात्री गावातील सुका नाईक, श्रीराम राजाराम भील प्रल्हाद भील आदी व्यावसायिक डांगरी आणि सात्री या गावात दारू विक्री करत असून गावातील तरुण मुले आणि प्रौढ माणसे दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाल्याने गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. गावात अनेक लोकांनी दारू विक्री विरुद्ध आवाज उठवला परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. येथील महिलांनी मारवड पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता परंतु गावातील दारू बंदी झाली नाही. तसेच मारवड पोलीस ठाण्यात मोर्चा पण काढला होता मात्र उपयोग होत नाही म्हणून अखेर सोमवारी अमळनेर येथील डीवायएसपी कार्यालयात धडक दिली व अर्ज दिला आहे व आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे.
डीवायएसपी कार्यालयात दिलेल्या अर्जात अरुणा कोळी सुनंदा कोळी रेखा भोई, बेबाबाई कोळी रेखा कोळी कोकाबाई कोळी, ज्योती कोळी विमलबाई भोई मायाबाई पाटील मंगला बोरसे यांच्यासह अनेक महिलांचा यात समावेश आहे.