खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

उपप्राचार्य प्रा. एन. के. कुळकर्णी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) उपप्राचार्य प्रा. एन. के. कुळकर्णी यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधुन ह. भ. प. प. पू. प्रसाद महाराज यांच्या हस्ते समस्त समाजबांधव यांच्या उपस्थितीत वाडी संस्थानाच्या प्रांगणात ‘समाजरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांनी समाजीक व धार्मिक क्षेत्रात केलेले उल्लेखनिय कार्य आणि आर्थिक योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. ते भडगाव येथील सौ र. ना. देशमुख आर्ट्स सायन्स आणि काॅमर्स काॅलेज मधुन उपप्राचार्य पदावरून सेवा निवृत्त असुन यापुर्वी ही त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button