
अमळनेर– मनुस्मृती जाळल्याप्रकरणी राज्याचे माजी उपमुख्य मंत्री, ओ बी सी नेते छगनराव भुजबळ यांना काल ता.२८ रोजी निनावी पत्राद्वारे तुमचा दाभोलकर ,पानसरे करू अशी धमकी देण्यात आली होती.या पाश्वभूमिवर आज ता.२९ रोजी महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अखिल भारतीय समता परिषद,ओ बी सी व बहुजन समाज बाँधवानी अमळनेर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सखल ओ बी सी व बहुजनाचे आधारस्तम्भ फुले ,शाहु ,आंबेडकर विचारांचे प्रचारक माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी मनुस्मृती विरोध केल्यास तुमच्या पानसरे ,दाभोलकर करू असा मजकूर असलेले धमकी पत्र भुजबळ फार्म नाशिक येथे पाठविन्यात आले आहे. हे पत्र कुणी लिहिले याचा तपास शासनाने तात्काळ करून त्यांचेवर गुन्हा दाखल करून बंदोबस्त करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र माळी समाज महासंघ ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, ओबीसी बांधव व बहुजन समाज आक्रमक होईल याची खबर दारी शासनाने घ्यावी. असे सांगण्यात आले असून यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन,महाराष्ट्र माळी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष दिनेश माळी,माजी युवक जिल्हाध्यक्ष भीमराव महाजन, शिव प्रतिस्थानचे अध्यक्ष रणजीत शिंदे,समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस बाबुलाल पाटील, नगरसेवक धनराज महाजन,माजी नगरसेवक धंनजय महाजन,माळी महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष मुरलीधर चौधरी,माळी समाज सुधारणा मंडळाचे सचिव मनोहर महाजन, माळी महासंघ जिल्हा सरचिटणीस प्रा.नितिन चव्हाण, युवक जिल्हाअध्यक्ष प्रा.हिरालाल पाटील, तालुकाध्यक्ष अमोल माळी,चर्मकार समाजाचे अध्यक्ष नरेश कांबळे,नगरसेवक देविदास महाजन,योगेश महाजन,प्रताप पाटील, जाकिर मेवाती आदी बहुजन समाज बांधव उपस्थित होते.