ई-पब च्या माध्यमातून रोजगार मिळलेल्याना आ शिरीष चौधरींच्या हस्ते धनादेशाचे वाटप…

अमळनेर मतदार संघासाठी हिरा उद्योग समूह ठरतोय रोजगार निर्मितीचे केंद्र,वर्षभरात 8 ते 10 हजार युवकांना रोजगार देण्याचा आमदारांचा संकल्प..अमळनेर (प्रतिनिधी )मतदारसंघ हा बेरोजगार मुक्त व्हावा व सगळ्याना रोजगार मिळावा यासाठी अमळनेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी यांनी सिंगापूरच्या कंपनीशी बुक ऑनलाइन करून देण्याचा करार पब अंतर्गत करून आता पर्यत शेकडो विद्यार्थी, पुरुष व महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याने त्या सर्वांना मानधन पोटी आलेल्या धनादेशाचे वाटप एका छोटेखानी कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्ताने हिरा उद्योग समूह आता खऱ्या अर्थाने अमळनेर मतदार संघासाठी रोजगार निर्मितीचे केंद्र ठरत असल्याची भावना उपस्थित लाभार्थ्यांनी व्यक्त केली,तर आ चौधरी यांनी शेतीला पाणी हाताला काम हि संकल्पना घेऊन अमळनेर मातृभूमीत प्रवेश करून गत निवडणूकीत बेरोजगार मुक्त मतदार संघ करण्याचा शब्द जनतेला दिला होता आणि त्याचीच वचनपूर्ती त्यांनी या उपक्रमातून दिली असल्याचे सांगितले व ई-पब च्या माध्यमातून एप्रिल महिन्यापासून आता पर्यंत शेकडो विद्यार्थी/ विद्यार्थीनी/ गृहिणी/पुरुष आदींना या उपक्रमाद्वारे रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच या रोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा पायावर उभे नक्कीच राहता येईल असा मोबदला देखील मिळत असून वर्षभरात यासारखेच रोजगाराभिमुख उपक्रम राबविणार व अजून किमान 8 ते 10 हजार युवकांना रोजगार देऊन मतदार संघ बेरोजगार मुक्त करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.विशेष म्हणजे या रोजगाराभिमुख उपक्रमा मध्ये सहभाग होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला आयडी द्यावा लागतो व त्या एका आयडी ची किंमत 15,000 रु असून त्याचा संपूर्ण खर्च हिरा फाऊंडेशन मार्फत करण्यात येतो.तरी जास्तीतजास्त विद्यार्थी व महिलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार चौधरी यांनी केले आहे. सदर उपक्रमा साठी किरण तायडे 8600515163 किंवा आमदार कार्यालय 02587228811 स्टेशन रोड अमळनेर येथे संपर्क करून या उपक्रमात सहभागी होता येईल असे आ शिरीषदादा चौधरी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *