अपंगांसाठी ५% निधी नगरपरीषदने खर्च न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलनाचा इशारा…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषदने अपंगासाठी राखीव असलेला 5% निधी खर्च होत नसल्याची तक्रार योगेश मोहन पवार ,दिपक आनंदा पाटील लीलाबाई मंगा पाटील यांनी व त्यांच्या सोबत असणाऱ्या अपंग बांधवांनी अमळनेर नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी केली होती. त्याच बरोबर नामधारी नगराध्यक्ष व अप्रत्यक्ष नियंत्रक माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्याकडे देखिल प्रत्यक्ष भेटून अपंगांसाठी 5% निधी खर्च करण्यात यावा अशी विनंती केली होती. राजकीय सत्तेच्या नशेत बेधुंद असलेल्या त्या लोक प्रतिनिधींना अपंग बांधवांच्या दुखाची व कष्टाची यांना जाग येईल कशी.? जनतेचा रखवालदार, सेवकच कुंपण खावू लागल्यावर न्याय मागायचा तरी कुणाकडे.? असा सवाल त्या दिन-दुबळ्या अपंग बांधवांसमोर उभा राहिला आहे.
यावेळी प्रहारचे कार्यकर्ते योगेश पवार व त्यांचे अपंग सहकारी सह प्रहार जनशक्ती पक्षाचे,तालुका अध्यक्ष, पंकज पाटील सतत पाठपुरावा सुरू असतांना अपंग बांधवांच्या तक्रारीची दखल घेत पंकज पाटील यांनी मिळालेल्या माहिती अधिकारातील माहिती नुसार शासन नियमाच्या अनुषंगाने अपंग बांधवासाठी 5% निधी खर्च होत नसल्याची ऑनलाईन तक्रार केली. त्यात अपंग बांधवांसाठी अपंगांच्या शालेय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी,अमळनेर बस स्थानकात व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात यावी,उत्पनाच्या अटीवर घरकुलांना अर्थसहाय्य देणे,शॉपिंग माँल,मंड्या इत्यादी मध्ये अपंगाना स्टॉल उभारण्याकरता अर्थ सहाय्य करणे, अपंगाना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करणे , सार्वजनिक वाचनालयात अंध व्यक्तीकरिता ऑडीयो लायब्ररी तयार करणे, अपंगांच्या मागणी नुसार त्यांना उदरनिर्वाह /व्यवसाय/साहित्य खरेदी करण्याकरिता त्यांच्या खात्यात थेट निधी उपलब्ध करण्यात यावा, नगरपरिषदेने शाळेमध्ये अपंग विद्यार्थांकरिता सोयी सुविधा उपलब्ध करणे, अपंगासाठी रात्र निवारा उभा करणे, अपंगाना बेरोजगार भत्ता देणे,अपंगाना पेन्शन योजना सुरु करणे, अपंगाच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे या सर्व मागण्या करण्यात आल्या असून शासकीय नियमानुसार कामकाज न केल्यास मुख्याधिकारी न.प. अमळनेर यांच्यावर शिस्तभंगाची मागणी केली आहे. त्याच बरोबर अपंग बांधवाचा निधी वेळेवर खर्च न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अमळनेर नगरपरिषदे समोर अपंग बांधवांना घेवून आंदोलन करू असा इशारा देखिल त्यांनी दिला आहे.
मुख्याधिकारी यांची तक्रार कार्यसम्राट आमदार शिरीष दादा चौधरी, जिल्हाधिकारी जळगांव ,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,प्रधान सचिव नगर विकास विभाग,लोकनायक आमदार मा.बच्चू भाऊ कडू ,राज्य मंत्री नगर विकास रणजीत पाटील व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *