अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुका विधी सेवा समिती अमळनेर व ग्रामपंचायत सबगव्हान यांच्या तर्फे २६ रोजी सरकारी योजना व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी न्या.वरिष्ठ स्तर हितेंद्र अनिलकुमार वाणी, प्रमुख वक्ते न्या विठ्ठल चौखुंडे,व गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सबगव्हान सरपंच नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. यावेळी न्या चौखुंडे यांनी तालुक विधी सेवा समिती देशात कधी पासून स्थापन झाली , समिती कुठे आहेत, व त्यांचे कार्य इ.बाबत जागृती केली. वायाळ यांनी सरकारच्या स्वच्छ भारत अभियान , रमाई आवास योजना, अनुसूचित जाती, जमातीसाठी योजना, महात्मा गांधी ग्राम रोजगार,योजने नुसार अनुदान, शबरी योजना अनुदान, आदी बाबत मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात बोलताना न्या वाणी यांनी बाळाच्या जन्माच्या नोंदी, जन्म मृत्यू कायदा, मुलाचा मोफत व सक्ती चा शिक्षण हक्क कायदा, ज्येष्ठ नागरिक सुविधा योजना, त्यांना नागरिकांना सांभाळले नाही तर होणारी शिक्षा इ बाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरपंच नरेंद्र पाटील यांनी तर सूत्रसंचालन ऍड तिलोत्तमा पाटील, आभार ऍड एजाज काझी यांनी केले. नंदलाल सूर्यवंशी, राजेंद्र चौधरी, के आर बागुल, तुषार पवार, रोहिदास जाधव, श्रीराम पाटील, मॅचिंद्र पाटील, संतोष पाटिल, सुरेश पाटील,भालचंद्र पाटील,नामदेव पाटील, वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर पाटील,भरत पाटील,निंबा पाटील,आदीनी परिश्रम घेतले.