अमळनेर (प्रतिनिधी)-मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यानुसार आर टी ई २५% आरक्षण हे आर्थिक,दुर्बल व वंचित घटकांसाठी राखून ठेवले असून त्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आलेले आहे. आर टी ई २५% अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या प्रवेशांचे शैक्षणिक वर्ष २०१७ -१८ व २०१८-१९ चे प्रवेश शुल्क अजुनही मिळालेले नाही.यामुळे संस्थाचालकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे व यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अडथळे निर्माण होत आहे म्हणून संस्थांना त्वरीत प्रवेश शुल्क मिळावे तसेच अमळनेर सह शेजारील तालुक्यांना संजीवनी ठरणार्या निम्न तापी पाडळसरे धरण प्रकल्पास निधीची तरतुद करुन धरणाचे काम जलदगतीने सुरु करावे यासाठी हिवाळी अधिवेशनात मागणी करावी ह्या मागणीचे निवेदन मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा राधाकृष्ण विखे पाटील व महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना धनंजय मुंडे यांना कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक तथा जिजाऊ बहुद्देशिय संस्थेचे संचालक पराग पाटील,अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष अमोल माळी,अभिनव बहुद्देशिय संस्थेचे सचिव श्री भटु पाटील,भुषण पाटील यांच्याहस्ते देण्यात आले.