अमळनेर-भाजप पक्षासाठी अतिशय प्रामाणिक आणि निष्ठेने काम केल्याने एक सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून भाजपा अमळनेर मंडलाचे अध्यक्षपद मला मिळाले असून मला मा.जिल्ह्याध्यक्ष,पक्षश्रेष्ठी तसेच कार्यकर्त्यानी देखील स्वीकारून मान्यता दिली आहे.तरीही सामान्य कार्यकर्त्यांचा कधीही सन्मान न करणाऱ्या माजी आ. डॉ बी. एस. पाटील यांना मी तोतया वाटत असल्यास त्यांनी मी तोतया असल्याचे सिद्ध करून दाखवावे असे थेट जाहीर आव्हान भाजपाचे शहराध्यक्ष शितल देशमुख यांनी डॉ पाटील यांना दिलेल्या पलटवारात दिले आहे.तसेच आम्ही कुठे पिंगा घालतो हे पाहण्यापेक्षा तुंम्ही खा शिं मंडळ पदाधिकाऱ्यांकडून वारंवार अपमानित होऊनही केवळ हव्यासापोटी खा शि मंडळाच्या भोवती पिंगा घालत असल्याचा टोलाही या पत्रात लगावला आहे. जिथे जाऊ तेथे भँऊ $ $भँऊ करणाऱ्या खेकड्याच्या वृत्तीमूळे ज्यांना स्वतःचे घर सांभाळता आले नाही मतलबा साठी दूसऱ्या (पक्षा) शी संसार करून परतून आलेल्या बाटवलेल्यांनी आम्हा पक्षनिष्ट कार्यकर्त्यांना शहाणपण शिकवू नये होय आम्ही भिंगोटेच आहोत पण कमळाच्या फूला भोवतीच फिरणारे आहोत स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी तूमच्या सारखा खा.शी. चा वाटा घेतांना तत्व निष्ठता गहाण ठेवून तर कधी जातीयवादीचा मूद्दा घेवून नेत्यांवर टिका करून प्रत्येकाला चावा घेणारा मच्छर नाही.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, सततच्या पक्षविरोधी कारवायांमुळे डॉ बी. एस.पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी एकमुखी मागणी अमळनेर शहर व तालुक्यातील जवाबदार भाजपा कार्यकर्त्यानी लेखी पत्रान्वये भाजपा जिल्हाध्यक्षाकडे केल्याने सद्यस्थितीत चिडचिड झालेल्या डॉ.पाटील यांचा तोल जास्तच ढासळला व त्यांच्या विरोधात तक्रारी करणारे सच्चे पदाधिकारी व कार्यकर्तेच त्यांना तोतया असल्याचे भासू लागले आणि भाजपाच्या तोतया शहराध्यक्षांची अशी ही बनवा बनवी,, या मथळ्याखाली त्यांनी खबरीलाल च्या माध्यमातून पत्र प्रसिद्धीस देऊन नेहमी प्रमाणे “उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग” अशा उतावीळ स्वभावाचे दर्शन घडविले.मात्र आता मी ठासून सांगतो की डॉ पाटील हे पक्षासाठी अत्यंत घातक असून ते पक्षात नकोच अशी शतप्रतिशत भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा आहे,दिलेल्या तक्रारीतील एकही सही बनावट नसून आमच्या सत्य भावनांचा तो उद्रेकच आहे,सामान्य कार्यकर्त्यांना हे बगलबच्चे म्हणत असतील तर हे दुर्देव आहे,यांच्या भोवती जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही हे त्यांचे बगलबच्चे म्हणत नसावेत हे कशावरून.कार्यकर्ता कोणताही असो तो प्रामाणिक आणि निष्ठावान च असतो यामुळे नेत्यानेही त्यांना सन्मान देणंच अपेक्षित असत,मात्र तालुक्यात केवळ डॉ बी. एस. पाटील वगळता बहुतांश नेते कार्यकर्त्यांचा सन्मान करतात हा आमचा अनुभव असून कृपया कार्यकर्त्यानीही डॉ पाटील यांच्याकडून उगाच सन्मानाची अपेक्षाही करू नये हाच आपला मैत्रीपूर्ण सल्ला आहे.डॉ पाटील यांनी तीनदा आमदारकी भोगून आपल्या सर्व इच्छा,अपेक्षा,आणि कामना पूर्ण केल्या असून आता उतार वयात ते आहेत,यामुळे जनतेच्या दृष्टीकोनातून नेता म्हणून ते जवळपास हद्दपारच झाले आहेत,यामुळे त्यांनी कितीही वायफळ बळबळ केली तरी फारसे त्यांचे काही बिघडणार नाहीच मात्र खरे नुकसान होईल ते त्यांच्याभोवती असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचे आणि त्यांचीच आम्हाला चिंता आहे.भाजपवासी झालेल्या ज्या कृषिभूषण साहेबराव दादांना हे उपऱ्या संबोधतात त्यांची किंमत किती याची जाण आम्हा कार्यकर्त्यांसह पक्षश्रेष्ठीना देखील आहे. आणि आमची सामाजिक तसेच राजकीय पत किती हे त्यांना सांगायची गरज नसून त्यांनी आंमच्यासह पक्षाला संपविण्याचा विडाच उचलला असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ पाटील हे स्वतःला तत्वनिष्ठ आणि स्वाभिमानी समजतात मात्र खा. शि. मंडळात एकदा धिप्पाड दादाच्या हातचे खाऊन झाले आणि आताही नवतरुण संचालकांनी अक्षरशःअपमानित करून बाजूला सारले तरीही हे तेथेच घुसतात याला कोणता स्वाभिमान म्हणायचा.केवळ सत्ता आणि माल एवढीच लालसा यांना असून त्यासाठीच हा अट्टहास आहे.पक्षात प्रदेश पातळीवर पद मिळवायला देखील यांनी अनेकदा काही नेत्यांकडे पिंगा घातला आहे,परंन्तु कोण किती प्रामाणिक आणि कामाचा याची जाण पक्षश्रेष्ठीना असल्याने यांना तेथे थारा नाही व यामुळेच यांची ही जळफळाट आहे.
भारतीय जनता पार्टी हि आता संपूर्ण देशाची आणि जनतेची झालीच आहे यामुळे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे या पार्टीला बा…ची प्रॉपर्टी मुळीच संमजू शकत नाही,अत्यंत शिस्तप्रिय पार्टीबाबत असे बोलणे याना शोभत देखील नाही,आमच्या तक्रारीबद्दल इतकेच यांना वाईट वाटत असल्यास कार्यकर्त्यांसमोर बैठकीत येऊन दिलगिरी व्यक्त करावी आम्ही प्रामाणिकपणे तक्रार मागे घेऊ असा खुलासा देशमुख यांनी “खबरीलाल” ला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.