अमळनेर (प्रतिनिधी) सानेनगर मधील प्रभाग २ मधील मुतारी तोडणाऱ्या मधुकर धुडकू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रभागातील नगरसेविका नूतन महेश पाटील व नगरसेवक संतोष पाटील यांनी मुख्याधिकारींकडे केली आहे.
४५ ते ५० वर्षांपासून असणारी मुतारी ही शासकीय मालमत्ता असतांना नागरिकांची गैरसोय करत चव्हाण यांनी ती मुतारी तोडली त्यामुळे गुन्हा दाखल करून नवीन मुतारी त्वरित बांधून नागरिकांची सोय करण्याची मागणी ही दोघं नगरसेवकांनी केली आहे.