मुडी कडून सोनगीर जाणारी बस दिड तास उशिरा..(प्रतिनिधी:भरत पाटील)अमळनेर मुडी येथून सोनगीर जाणारी रेग्युलर बस अचानक खराब झाल्यामुळे महामंडळाने दुसरी बस पाठवली पण ते मुडी वरूनच बस फिरवत होते तेव्हा विद्यार्थ्यांनी व लोकप्रतिनिधींनी बस अडवली त्यांना जाब विचारण्यास आले तेव्हा त्यांनी सांगितले की वाहतूक नियंत्रक ब्रिजलाल आहिरे यांनी आम्हाला मुडी पर्येंत जाण्यास सांगीतले आहे ..आमची ड्युटी संपण्यात आहे तरी आम्ही जाऊ शकत नाही..दीड तास असच चाललं शेवटी ते त्यांच्या शब्दावर ठाम होते शेवटी डेपो मॅनेजर बाविस्कर यांनी भ्रमणध्वनी द्वारे सांगितल्यावर बस जाण्यास निघाली.
या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांचे प्रत्यक्षिक बुडाले व् पेपरला उशीर झाला बस चा हा नेहमीच प्रॉब्लम लवकरात लवकर मार्गी नाही लागला तर दिवाकर रावते व जळगाव DC यांच्याकडे निवेदन देण्यात येईल.असे सरपंच काशिनाथ माळी उपसरपंच नारायण पाटील व मुडी ग्रामपंचायत व असंख्य ग्रामस्थांनी केली आहे.