अमळनेर (प्रतिनिधी)पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे स्मृती व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी हया ग्रंथालयतर्फ स्मृती व्याख्यान मला आयोजित करण्यात येत आहे कै प्रा श्रीमती पदमाताई निजसुरे व प्रा श्री टी.एच.बारी यांनी आपल्या नातेवाईकांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून दिनांक २७/१०/२०१८ व २८/१०/२०१८ आँक्टोबर या दिवशी संपन्न होणाऱ्या स्मृती व्याख्यानमालेस आपण आवश्य उपस्थित राहून याचा लाभ घ्या असे एका पत्रकाद्वारे आयोजकांनी कळविले आहे.
दिनांक २७/१०/२०१८ वार शनिवारी सांयकाळी ६-३० वाजता “निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली” दिक्षीत मंत्र या विषयावर डॉ मुकुंद करंबळीकर चाळीसगाव यांचे असून प्रमुख अतिथी डॉ राजेंद्र पिंगळे अमळनेर, डॉ महेंद्र चव्हाण अमळनेर हे राहणार आहेत.व दिनांक २८/१०/२०१८ वार रविवारी संध्याकाळी ६-३० “महात्मा गांधी” प्रा.डॉ एल.ए.पाटील माजी प्राचार्य प्रताप महाविद्यालय अमळनेर असून प्रमुख अतिथी डॉ प्रा.एच.टी .माळी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी हे राहणार आहेत.
वरील व्याख्यानमाला पू सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय जुना टाऊन हाँल अमळनेर येथे असून जास्तीत जास्त नागरिकांनी व्याख्यानमालाचा लाभ घ्या असे वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्ष सौ.प्रा.डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ,सयुंक्तचिटणीस सुमित कुलकर्णी विश्वस्त चंद्रकांत नगांवकर ,सदस्य अँड रामकृष्ण उपासनी,पी.एन भादलीकर, भिमराव जाधव,निलेश पाटील, ईश्वर महाजन, दिपक वाल्हे,प्रसाद जोशी यांनी कळविले आहे.