अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील टाकरखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते आशिष रतीलाल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रंथालय सेलच्या सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, ग्रंथालय सेलच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रिता बाविस्कर प्रदेश समन्वयक उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील , कार्याध्यक्ष सुरेश पाटील, शहर अध्यक्ष मुख्तार खाटिक , ग्रंथालय सेलचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर देसले, किसान सेलचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, आय टी सेलचे तालुकाध्यक्ष भुषन पाटील यांचे उपस्थितीत अमळनेर येथील कार्यालयात देण्यात आले. या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, ग्रंथालय सेलचे कार्यक्रम, राजकिय कार्यक्रम, कार्यकर्त्यां पर्यंत सोशल मिडियातून प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी सह युवकांनी प्रेरित करण्याची जबाबदारी आशिष पाटील यांना देण्यात आली असून या निवडीने त्याचे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष बाळु पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल शिंपी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योजनाताई पाटील, शहराध्यक्ष आशाताई चावरीय आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कौतुक केले व जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.