खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

दुचाकीवर डिजिटल मीटर असल्याचा क्लूने चोरट्या दोघा मावसभावाना ठोकल्या बेड्या

महिलांच्या गळ्यातून लांबवले होते सोनसाखळ्या , मंगळसूत्र

अमळनेर (प्रतिनिधी) मोटरसायकलवर डिजिटल मीटर असल्याचा क्लू पकडून पोलिसांनी शहरात विविध भागातून महिलांच्या गळ्यातून सोनसाखळ्या , मंगळसूत्र लांबवणाऱ्या पिंपळे व धुळे येथील दोघा मावसभावाना बेड्या ठोकल्या. यामुळे महिलांनी या कारवाईचे समाधान व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी महाराणा प्रताप चौकात वंदना गणेश पाटील या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोघांनी मोटरसायकलवर समोरच्या दिशेने येऊन ओढून नेले होते. आरोपींच्या नवीन मोटरसायकलवर डिजिटल मीटर होते, याची माहिती मिळाली. यावरून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे ,मिलिंद भामरे ,सूर्यकांत साळुंखे याना मोटरसायकल विक्रेत्यांकडे चौकशी केली आणि पोलीस पिंपळे येथील शिवाजी निंबा चौधरी (वय ३२) याच्याकडे पोहचले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मावस भावासोबत मंगळसूत्र लांबवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचा मावसभाऊ सुनील नारायण चौधरी (वय ३८ रा. अलंकार सोसायटी धुळे) याला पकडून आणले. त्यालाही पोलिसी खाक्या दाखवून घटनास्थळी नेऊन जनतेसमोर कबूल करायला लावले. त्यांनी दोघांनी अमळनेर शहरात महाराणा प्रताप चौक , शिवाजी बगीचा सह इतर सहा ठिकाणी महिलांच्या गळ्यातून दागिने लांबवल्याची कबुली दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button