खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सूड भावनेने राहुल गांधी मोदी सरकारकडून टार्गेट, देशाची लोकशाही आली धोक्यात

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे पक्ष निरीक्षक अॅड. संदीप पाटील यांनी केला आरोप

अमळनेर (प्रतिनिधी) यशस्वी केलेली भारत जोडो यात्रा, संसदेत उचललेले दमदार मुद्दे आणि आणि त्यांच्या समर्थनार्थ बदलत असलेले जनमत यांमुळेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोदी सरकारकडून टार्गेट केले जात असून सर्व सूड भावनेने सुरू आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा पक्षाचे निरीक्षक अॅड. संदीप पाटील यांनी करत काँग्रेस सर्वत्र बळकट होत असल्याचा दावा त्यांनी केला.
जय योगेश्वर विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अॅड. संदीप पाटील तसेच ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, धुळे जिल्हा उपाध्यक्ष के डी पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,माजी सरचिटणीस अजबसिंग पाटील उपस्थित होते,सुरवातीला प्रास्तविक संदीप घोरपडे यांनी केले काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने मोदी सरकारचा भंडाफोड करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
पत्रकारांना संबोधित करताना अँड संदीप पाटील म्हणाले की राहुल गांधी विरोधात मोदी सरकारने जी वर्तणूक सुरू केली आहे तिचा विरोध करण्यासाठी आणि राहुल गांधी यांचे समर्थन करण्यासाठी ही पत्रकार परिषद होत असून प्रत्येक जिल्ह्यात माजी मंत्री व नेते पत्रकार परिषदा घेत आहेत,

अदानी ग्रुपचा घोटाळा आणला उघडकीस

राहुल गांधींनी संसदेत धडाकेबाज भाषण केले, त्यांनी जे मुद्दे मांडले त्यावर भाजपला उत्तर देण्याचे सुचत नाही, अदानी ग्रुपचा घोटाळा त्यांनी उघडकीस आणला, पूर्वी श्रीमंत व्यक्ती मध्ये 690 वर असणारे अदानी दोन नंबरला पोहोचले कसे यावर देखील राहुल गांधी यांनी शंका उपस्थित केली,तो घोटाळा उघडकीस आला तेव्हा शेअर चे भाव घसरले, या विषयी राहुल गांधीनी बोलू नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले,संसदेत जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करून याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली असताना मोदी सरकार तो निर्णय घ्यायला तयार नाही,यामुळे कुठेतरी काळ बेर आहे हे लोकांना पटायला लागले आहे,सर्व काही लपवित असल्याने काही बाहेर येऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.

ओढून ताणून गुजरात कोर्टात केस

राहुल गांधी यांनी ते भाषण कर्नाटक मध्ये केले असताना ती केस ओढून ताणून गुजरात कोर्टात आणली गेली,त्यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली त्यानंतर अपील करायला दोन महिने मुदत असताना दुसऱ्याच दिवशी 25 तासात संसदेत तील सदस्यत्व रद्द केले गेले,नंतर चार दिवसात निवासस्थान खाली करायची नोटीस दिली हे सर्व सूड भावनेने सुरू असुन लोकशाही धोक्यात आली आहे,मोदींना वाटते की आम्हाला कुणी पराभूत करू शकत नाही,पण सामान्य माणसाला आता सर्व लक्षात येत आहे.

महागाई, बेरोजगारी वाढतेय

महागाई, बेरोजगारी हे प्रश्न वाढत आहे, सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत,सर्व सामान्य लोकांच्या प्रश्नी ते बोलत नसून केवळ विरोधी पक्ष ला दाबायचे काम सुरू आहे.तसेच पंतप्रधान असताना पंडित नेहरुणी पहिला ओबीसी आयोग 1953 ला स्थापन केला,नोकऱ्यांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण काँग्रेसने आणले,पण मोदींनी ओबीसी साठी काय केले हा आमचा सवाल आहे,अन्यायाच्या विरोधात आय सपोर्ट राहुल गांधी यांनी मोहीम सर्वत्र सुरू केली आहे,भारत जोडो यात्रा राहुल गांधी नी सुरू केली,पावणेचार हजार किलोमीटर ते या यात्रेत चालले, रोज तीस किमी चालून यात्रा पूर्ण केली,मोठा जनसागर त्यांच्या सोबत होता,यामुळे जनमत बदलत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची मोठी प्रतिमा पाहूनच त्यांना राजकीय दृष्ट्या टार्गेट केले जात आहे.

हात से हात जोडो अभियान सुरू

हात से हात जोडो अभियान देखील आता काँग्रेसने सुरू केले असून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचुन पक्ष बळकटीची आम्हाला संधी आहे,यामुळे जास्तीतजास्त लोक काँग्रेस सोबत जुळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जयवंतराव पाटील, प्रा श्याम पवार, बन्सीलाल भागवत, बी के सूर्यवंशी, संभाजी लोटन पाटील, महेश दगडू पाटील, राजू फाफोरेकर,सईद तेली यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button