खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

रेशन गोडाऊनमध्ये दरमहा धान्यावर दरोडा, चटावलेला ‘वाघ’ अधिकच फाडतो जबडा

तक्रार आल्यास ढुंगणाची तोडतो लक्तरे, अन्‌ सो चूहे खाके बिल्ली हज को चली रे !

अमळनेर (खबरीलाल विशेष) येथील रेशनच्या गोडाऊन मधील सर्वसामान्य नागरिकांच्या धान्यावरच गोडाऊन व्यवस्थापक अनिल पाटील हे दर महिन्याला शेकडो क्विंटल मालावर दरोडा टाकत आहे. यातून रीतसर ते बिन शेपटीच्या तालुक्याच्या ‘वाघा’ ला न चुकता नैवेद्य देतात. त्यात वरुण कोणी तक्रार केली तर’ चटावलेला हा ‘वाघ अधिकच जबडा फाडतो आणि अनिल पाटील यांच्या ढुंगणाची लक्तरे तोडतो, जणू ही तक्रार त्यांच्यासाठी ‘सोने पे सुहागा’च असते! आणि वरुन सो चूहे खाके बिल्ली हज को चली! असा त्यांचा अविर्भाव असतो..म्हणूनच ते “गोड बोल्या आणि ढोपर सोल्या” म्हणून ओळखले जातात, एवढी त्यांची कीर्ती महान आहे…
अमळनेर शहरासह तालुक्यातील रेशन दुकानदारांना माल पोहोचविण्यासाठी अमळनेर येथे शासकीय गोडाऊन आहे. येथे जिल्हा स्तरावरून गहु, तांदुळसह अन्य मालाचा पुरवठा केला जातो. आणि येथून तो दुकानदारांना वाटप केला जातो. आणि येथूनच खरा मालावर डल्ला मारायला सुरुवात केली जाते. म्हणून गोडाऊन व्यवस्थापक म्हणून बसण्यासाठी अनेक जण झड्या मारतात. अनिल पाटील यांचीही येथे अशीच वर्णी लागली आहे. यासाठी त्यांनी ‘किती मोजले’ हे आता काही लपून राहिलेले नाही, कारन ते आता येथे पाहिजे तसे ‘मोजून घेऊ’ राहिले, हेही उघड झाले आहे.

हा जास्तीचा माल येतो कसा?

पुरवठा धारकाकडून अमळनेर गोडाऊनला माल येतो तेव्हा एका ५० किलोच्या पोत्यात ५० किलो माल असतो. त्या प्रत्येक गहू व तांदूळाच्या पोत्यातून प्रत्येकी १ किलो माल हमाल काढतो आणि तो माल गोडाऊनमध्ये जमा केला जातो. त्यामुळे संबंधित रेशन दुकानादाराला केवळ एका क्विंटलमध्ये ९८ किलोच माल देतात. त्यामुळे गोडाऊन मध्ये दरमहा शेकडो क्विंटल अवैध माल गोळा होतो. आणि यंत्रणा मालामाल होते.

अशी लावली जाते विल्हेवाट

गोळा झालेला शेकडो क्विंटल अवैध मला काही रेशन दुकानदारांना दिला जातो. तर काहींना थेट पुरवला जातो, याबाबत काही तक्रार झाली तर तपासात रेशन दुकानदार अडकतो, दुकान वाचविण्यासाठी त्याची ही तोंडाला रक्त लागलेले ‘वाघ’ बाजार करतात. तर दुसरीकडे तक्रारदार याला गोलमाल करून बोळवण करून टाकतात. अशा भ्रष्ट साखळीची सर्वसामान्य माणसांना कल्पना ही नसते. त्यांच्या मालावर डल्ला मारणारे त्यानाच कायद्याचा धाक दाखवून गप्प बसवतात, म्हणून अशांना आता येथून घालवण्याची वेळ आली आहे.

उद्या वाचा
तक्रारीची बोळवण अन्‌ ‘वाघाची मळमळ ; आपण सारे भाऊ, मिळून मिसळून खाऊ!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button