अमळनेर (प्रतिनिधी) सध्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शाळेच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षावर विद्यार्थ्यांनी लक्ष केद्रीत करावे.अवांतर पुस्तकांचे वाचन करावे,आई ,वडीलानंतर आपला तिसरा गुरु शिक्षक आहे.त्यांच्या आज्ञाचे पालन करावे.निसर्गाचे संवर्धन करा असा मंत्र अमळनेर हिंदी अध्यापक मंडळ, पंचायत समिती शिक्षण विभाग व युनियन बँक अमळनेर यांच्या संयुक्तपणे १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त लोंढवे येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षीसवितरण सोहळा लोंढवे माध्यमिक विद्यालयात झाला. तेव्हा मार्गदर्शन प्रसंगी युनियन बँकेचे अमळनेर शाखेचे व्यवस्थापक मयुर पाटील बोलत होते.
व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे,माजी प.स. उपसभापती बाळासाहेब जिवन पाटील, जिल्हा परीषद सदस्या सोनुबाई राजू पवार,संदीप घोरपडे,सरपंच कैलास खैरनार,प्रा डॉ कुबेर भागवत सत्कारमुर्ती किशोर देवरे,भागवत बिरारी,सोपान भवरे होते.कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजन करून झाली.अध्यक्षस्थानी लोढंवे शाळेचे मुख्याध्यापक व माजी प.स.उपसभापती बाळासाहेब पाटील होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळाचे अध्यक्ष दिपक पवार यांनी केले.
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार ,कृतीशील अध्यापक पुरस्कार वितरण,व सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करून विदयार्थीना हिंदी भाषेचे महत्त्व समजून भाषेचे महत्त्व वाढत असुन मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे असे गटशिक्षणा- धिकारी अशोक बिऱ्हाडे,संदीप घोरपडे,यांनी सांगितले तर प्रा.डॉ कुबेर भागवत यांनी हिंदी भाषेची दशा आणि दिशा यावर सविस्त र उहापोह करुन हिंदी भाषेच्या सावत्रपणाच्या वागणुकीबद्दल खेद व्यक्त केला.तर अध्यक्षीय भाषणातून बाळासाहेब पाटील म्हणाले कि आमच्या शाळेत कार्यरम झाल्याचा मनापासून आनंद होत आहे.हिंदी ही सर्वात जास्त बोलणारी भाषा असून हि भाषा फक्त मुस्लीम बांधवांची आहे असा गैरसमज निर्माण झाला आहे.या भाषेमुळे संपर्क करणे सोपे होते असे सांगितले तर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर देवरे व कृतीशील अध्यापक भागवत बिरारी यांनी हिंदी अध्यापक मंडळाचे अभिनंदन करून आमचा सत्कार व पुरस्कार देऊन आमच्या जबाबदारीत वाढ केली आहे.असे सांगितले.
अमळनेर तालुका हिंदी शिक्षक मंडल, पं.स. (शिक्षण) विभाग व यूनियन बँक आँफ इंडिया, शाखा-अमलनेर यांच्या संयुक्तिक विद्यमाने गेल्या १४ सप्टेबर,हिंदी दिवस निमित तालुका स्तरीय ‘ मातृभाषा – मराठी व राष्ट्रभाषा -हिंदी सामान्य ग्यान स्पर्धा – २०१८’ चे आयोजन केले होते त्यात तालुक्यातील शहरी विभागातून १३ व ग्रामीण विभागातून ३३ माध्यमिक विद्यालयातून एकूण ५००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील इयत्ता ५ वी ते ७ वी तील लहान गटातून एकूण ४१ व ८ वी ते १० वी तील मोठ्या गटातून एकूण ५१ अशा विद्यालय स्तरावरील एकूण ९२ प्रथम विद्यार्थ्यांना पारितोषिक स्वरूपात स्मृति चिन्ह , प्रमाणपत्र व वाचनिय पुस्तक तर , त्याना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांना ‘राष्ट्रभाषा-हिंदी कृतिशील शिक्षक’ म्हणून स्मृति चिन्ह , प्रमाणपत्र व वाचनिय पुस्तक सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र तसेच मंडलाकडून दरवर्षी तालुक्यातील एक सेवानिवृत्त हिंदी विषय शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दिपक पवार, सचिव दिलीप पाटील, एन.आर.चौधरी, आशिष शिंदे,राजेंद्र पाटील, ईश्वर महाजन,मनोहर देसले, डॉ किरण निकम,ज्ञानेश्वर ईनशुलकर, प्रदीप चौधरी, मुनाफ तळवी,मनीष उघडे व हिंदी अध्यापक मंडळाचे सदस्य व स्व.आबासो एस.एस. पाटील माध्यमिक विद्यालयाय लोढंवे चे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.शेवटी आभार आशिष शिंदे यांनी मानले. यावेळी अमळनेर तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.