अजय धनगरच्या किडन्या विकण्याचा अपहरणकर्त्यांनी दिला इशारा...अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर ताडेपुरा येथील आकाश राजू धनगर उर्फ अजय याचे अपहरण च्या मागील नागमणी च्या लालसेतून झाल्याचे निष्पन्न झाले दरम्यान शून्य नंबरने शिक्रापूर पुणे येथे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
अमळनेर ताडेपुरा येथील आकाश राजू धनगर उर्फ अजय हा आपल्या आईवडिलांसोबत शिक्रापूर चौफुला येथे कामाला गेला होता तेथे त्यांची हॉटेल राजयोग च्या मालकाशी ओळख झाली मालकाने अजय व त्याच्या वडिलांशी खान्देशात नागमणी मिळतो तो आम्हाला मिळवून द्या म्हणून सांगितले त्यानंतर हॉटेल मालक व आकाश खान्देशात आले आणि निजामपूर जैताने येथे आकाशचा मेव्हणा सोनू याच्याशी 12 तारखेच्या आसपास भेट घेतली व नंदुरबार जिल्हयातील जामदा येथे नागमणी मिळत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यावेळी सोनुने त्या गावात जाऊ नका असे सुचवले मात्र नागमणी मिळवायचाच या लालसेने ते नंदुरबार जिल्ह्यातील जामद्याला गेले तेथे गेल्यावर त्या लोकानी अंधाऱ्या खोलीत नागमणी दाखवला ते पाहून हॉटेल मालक भारावले मात्र आज घ्यायचा असेल तर ऍडव्हान्स द्या नाहीतर दुसरे गिऱ्हाईक तयार आहेत असे सांगितल्यावर हॉटेल मालक ने गळ्यातील ३४ ग्राम सोन्याची साखळी काढून दिली व मणी ताब्यात घेतला मात्र शिक्रापूर आल्यानंतर तो मणी नकली असल्याचे समजले म्हणून मालक व आकाश धनगर उर्फ अजय परत निजामपूर ला आले व त्याचा मेव्हणा सोनूला घेऊन जामद्याला जाण्यासाठी आग्रह करत होते मात्र सोनुने नकार दिला की ते लोक चांगले नाहीत म्हणून पुन्हा फसू नका परंतु हॉटेल मालकाने लालूच कायम ठेवून जामद्याला गेले व नागमणी नकली असल्याचे सांगितले.त्यावेळी नागमणी देणाऱ्यांनी सांगितले की एक लाखात असली कसा मिळेल अजून तीन लाख रुपये लागतील असे सांगण्यात आले म्हणून त्यांनी काही पैसे आकाश च्या आई वडील व आत्याच्या नावावर ट्रान्सफर केले व ते नागमणी वाल्याना दिले मात्र त्यांनी मणी दिला नाही व हॉटेल मालकासह इतरांना चोप देऊन बजरंग बनवून पळवून लावले नागमनीही मिळत नाही व पैसे ही गेले म्हणून त्यांनी परत आकाश उर्फ अजय ला अमळनेर आणले आणि आकाश च्या कुटुंबाच्या मध्यस्थीमुळे पैसे गेले म्हणून त्यांनी आकाशला सोबत नेत दोन दिवसांनी आम्ही आकाश उर्फ अजय चे अपहरण केले असल्याचे अजय च्या वडिलांच्या भ्रमणध्वनी वर कळवले सतत दोन दिवस त्यांनी भ्रमणध्वनिवरून धमक्या दिल्या व औरंगाबाद ला असल्याचे सांगितले अमळनेर पोलिसात हॉटेल राजयोग मालक व त्याच्या आचाऱ्याविरुद्ध अपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आला.