अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील आकाश राजू धनगर उर्फ अजय याचे ४ लाख रुपयांसाठी दसऱ्याच्या दिवशी दोघांनी अपहरण केल्याची घटना घडली.
अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेला आकाश राजू धनगर उर्फ अजय वय १८ हा ६ महिण्यापासून आपल्या आई वडीलांसह पुणे शिक्रापूर चौफुला ता.शिरूर येथे रोजगारनिमित्त गेले होते. आकाश उर्फ अजय तेथील हॉटेल राजयोग चे मालक व आचारी पाटील यांच्यासोबत दसऱ्याला अमळनेर येथे एम.एच.१२ पासिंग च्या बोलेरो गाडीने अमळनेर येथे आले असता अजयच्या काका व आत्याकडे घरी एक दिवस एक रात्र राहून पहाटे सकाळी मंगल ग्रह मंदिरावर जाऊन येतो असे सांगून १९ तारखेला सकाळी सात वाजता तिघे निघून गेले नंतर २१ रोजी राजयोग हॉटेलवर अस-लेला आचारी पाटील नावाच्या माणसाने मुलाच्या वडिलांना फोन केला की तुमच्या मुलाने आमच्याकडून एक लाख किमतीची ३४ ग्राम सोन्याची चैन आणि सुमारे तीन लाख रुपये घेतले असून ते दिलेे नाहीत तर तुमच्या मुलाला आम्ही सोडणार नाहीत असे सांगितल्याची तोंडी तक्रार मुलांच्या वडिलांनी मध्यरात्री च्या सुमारास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना केली. या दरम्यान पो.नी.बडगुजर यांनी ठाणे अमलदारांना शून्य नंबर ने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले असून रात्री उशिरापर्यंत अपहरण मुलाच्या वडिलांने अमळनेर पोलिसात फिर्याद देण्याचे काम सुरू होते.