खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मारवड पोलिसांनी पांझरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करताना पकडले ट्रॅक्टर

अमळनेर (प्रतिनिधी) मारवड पोलिसांनी पांझरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करताना बेटावद येथील एकाला पकडून ट्रॅक्टरसह वाळू असा तीन लाख तीन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील व पोलीस उज्वल पाटील यांनी २३ रोजी सकाळी ७ वाजता बेटावद कडून भरवस गावाकडे येताना ट्रॅक्टर (क्रमांक एम एच १९ , एम ४९४) वाळू वाहतूक करताना आढळून आले. हे ट्रॅक्टर बाळा उर्फ गिरीश जयवंतराव पाटील (रा. बेटावद ता. शिंदखेडा) याचे असल्याचे समजले. पोलिसांनी ट्रॅक्टर ,ट्रालीसह वाळू मारवड पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आले असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button