खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्षाप्रतिपदे निमित्ताने शहरातून केले पथसंचलन

ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव करून केले स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्षाप्रतिपदे निमित्ताने पथसंचलन काढण्यात आले.त्यावेळी पथसंचलन मार्गावर रांगोळी काढलेल्या दिसल्या. नागरिकांनी संघ स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. सर्व स्वयंसेवक संघ गणवेशात उपस्थित होते.
सुरवातीला आद्य सरसंघचालक प्रणाम देण्यात आल्यानंतर शाखा लागली. गजानन कॉलनी येथून सुरू झालेले संचलन शिवाजी नाट्यगृहाजवळून,मंगलमूर्ती चौक ,कचेरी रोड मार्गे महाराणा प्रताप चौक, धुळे रोड मार्गे आनंद कॉलनी येथून गजानन कॉलनीत आले.हितेश शाह यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी तालुकास्तरिय विविध जबाबदारी घोषित केल्या. समारोपिय बौद्धिकामध्ये देवगिरी प्रांत संघचालक पराग कंगले यांनी केले तालुका ,जिल्हा, विभाग ,प्रांत यांच्या विविध जबाबदाऱ्या सांगितल्या. पाडवा हे नवीन वर्ष सर्वस्तरावरून नवं वर्ष रॅली सुरू झाल्याने नवीन वर्षाला आपण संध्याकाळी पथ संचालन सुरू केले आहे. सृष्टीचा नवीन दिवस असल्याने आपणही नवीन संकल्प करणे,स्वयंसेवकांनी संघ काम वाढीचा संकल्प करणे सुरूच आहे. संघ कार्याचा व्याप ४६ देशातसुरू असून आहे. ७० हजारांपेक्षा जास्त गावात संघ शाखा व संघ मिलन सुरू आहे. जॉईन आरएसएस नावाने ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यात सुरुवातीला कमी लोक जॉईन झाले पण २००९ नंतर दरवर्षी दोन ते अडीच लाख नागरिक स्वतःहून जॉईन होत आहेत. समाजाला सोबत घेण्याची कार्यशैली स्वयंसेवकांची असतेच पण ती अजून वाढवावी. अनुकूलतेत व्यवस्थित राहावे. भारत व हिंदुत्वाकडून जगाच्या खूप अपेक्षा वाढत असून योग व आयुर्वेदाने भारताचे महत्त्व वाढले आहे. जबाबदार स्वयंसेवक म्हणून कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वदेशीचा वापर,नागरी कर्तव्यांचे पालन आत्मसात करून भारतीय जीवन पद्धतीत जीवन जगावे असे सांगितले. त्यावेळी तालुकास्तरीय नियुक्तीमध्ये तालुका संघचालक म्हणून डॉ. चंद्रकांत पाटील, तालुका कार्यवाह म्हणून देवेंद्र तायडे, तालुका सहकार्यवाह म्हणून राकेश शर्मा ,अमळनेर नगर कार्यवाह म्हणून संकल्प वैद्य, नगरसहकार्यवाह म्हणून विजय पाटील,शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून तन्मय कुलकर्णी, बौद्धिक विभाग प्रमुख म्हणून नितीन पाटील, व्यवस्था प्रमुख म्हणून योगेश वाणी, महाविद्यालयीन प्रमुख म्हणून चंद्रकांत पाटील, विभागस्तरीय सदस्य म्हणून विकास जोशी अशा विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. योगेश वाणी यांनी आभार मानले.शेवटी संघ प्रार्थनेने समारोप झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button