खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

गुढी पाडव्याच्या दिवशी विद्येश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा गुढी पाडव्याच्या दिवशी उत्साहात झाला.
अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीमधे विद्येश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा दि.22 रोजी सकाळी 9:30 वाजता गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महामण्डलेश्वर स्वामी हंसानन्द तीर्थजी महाराज कपिलेश्वर मंदिर, अमळनेर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार अनिल भाईदास पाटील होते. तसेच आलेल्या मान्यवरांचा सत्कार मा.नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच रवि पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून कार्यक्रमाला सुरभी कॉलनी , मुंदडा नगर, अशोकरत्न नगर, शिव पार्वती कॉलनी, सप्तशृंगी कॉलनी, शाहू नगर विद्या विहार कॉलनी आदी परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button