अण्णाभाऊंचे साहित्य हे जातीवाद व शोषणाच्या विरोधात आहे- माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेअमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथे बहुजन रयत परिषद व न.पा. अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील धुळे रोड वरील चौकास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊन स्मारक उभारण्यात आले होते,त्याचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला,
या वेळी विधानसभा सदस्यां स्मिताताई वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, कामगार नेते रामभाऊ संदानंशीव, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक नरेंद्र संदानंशीव, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप सैदाने, आरपीआय चे तालुका अध्यक्ष यशवन्त बैसाने,बहुजन रयत परिषदेचे जिल्हा- ध्यक्ष प्रकाश बोरसे, गटशिक्षण अधिकारी अशोक बिऱ्हाडे,माजी नगरसेवक विक्रांत पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे कार्यध्यक्ष प्रा डॉ विजय तुंटे, निर्माता-निर्देशक विकास कुचेकर, नगरसेवक शेखा हाजी, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका कार्यध्यक्ष विजय गाढे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे तालुका अध्यक्ष गणेश चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सभेला संबोधित करतांना लक्ष्मण ढोबळे बोलले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे शोषित ,कष्टकरी कामगारांना ऊर्जा देण्याचे काम करीत होते, संयुक्त महाराष्ट्र राज्य चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे, देशातील जातीयवादी विचारधारे वर त्यांनी परखड मत आपल्या साहित्यातून मांडले आहे, अण्णाभाऊंच्या साहित्यात कामगार कल्याण व गुलामीच्या विरूद्ध बंड करण्याची दिशा दिली आहे, ढोबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील पात्रांची संकल्पना आपल्या अलंकारिक भाषेत उपस्थितां समोर मांडली व समाजाला शिक्षण घेण्याचे व एकसंघ राहण्याचे आवाहन त्यांनी केले, आपल्या 35 मिनिटाच्या भाषणात त्यांनी उपस्थितांचे मन जींकले तर उपस्थितानी टाळ्या वाजवून त्यांना भरभरून प्रतिसाद दिला,या प्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,अण्णा भाऊ साठें सांरख्या महान व्यक्तींच्या कार्याला उजाळा मिळावा व लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून अश्या प्रकारचे स्मारक उभारणे गरजेचे आहे म्हणून कार्यकर्त्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या कडे पाठपुरावा करून हे स्मारक नगरपालिका प्रशासना कडून पूर्ण करण्यात आले,गट- शिक्षण अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी आयोजकांच्या शब्दाला मानदेत आपले विचार मांडले,त्यात त्यांनी सांगितले की, दीड दिवस शाळा शिक्षण घेऊन अफाट उच्च दर्ज्याचे साहित्य निर्माण करणारे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची बुद्धिमत्ता वाखण्या सारखी आहे, अण्णाभाऊ यांनि बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन देशातील जातीयवादी वर्ण व्यवस्थेच्या विरोधात चळवळ उभारली होती,त्यांनी प्रथम देशाबाहेर महाराष्ट्रचे कुल दैवत बहुजन राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आपल्या पवाडाच्या माध्यमातून जगा समोर मांडला, त्या वेळीचे देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुद्धा अण्णा- भाऊ यांची दखल घेतल्याची त्यांनी सांगितले. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांचे कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्या पूर्वी मुलींनी स्वागत गीत म्हटले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रेम बोरसे यांनी मा.प्रा.ढोबळे यांचा परिचय करून दिला.पत्रकार अजय भामरे यांनी आपल्या मधुर वाणीने अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान प्रसिद्ध झालेले गीत’ माझी मैना गाव कडे राहिली’ गाऊन लोकांना मंत्रमुग्ध केले,लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते प्रा डॉ विजय तुंटे, प्रा डॉ रवी बाळस्कर तसेच फिल्म निर्माता विकास कुचेकर यांचा आप- ल्या सामाजिक योगदान बद्दल विशेष सत्कार करण्यात आला
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय मरसाळे (बहुजन रयत परिषद), सुरेश कांबळे(बहुजन रयत परिषद),, जितेंद्र कढरे, किरण लोखंडे, अनिल मरसाळे,संजय वाघ, संजय थोरात,भटू कांबळे सर, प्रा विजय वाघमारे, मिलिंद निकम, डॉ.राजीव कांबळे, नारायण गांगुर्डे,रवींद्र साळवे,सचिन जगदाने,ओंकार कढरे, आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास तालुक्यातून शेकडो मातंग समाज उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.जाधव व आभार हरिशचंद्र कढरे सर,यांनी मानले