खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा एल्गार, आजपासून बेमुदत उतरणार संपावर

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघही उतरणार आंदोलनात

अमळनेर (प्रतिनिधी) जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील विविध शाळा व शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांनी १४ पासून बेमुदत संपावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात विविध कर्मचारी संघटनांनी आपापल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदन देऊन संपाची हाक दिली आहे.
या बेमुदत आंदोलनात शिक्षक संघटनेचे संदीप घोरपडे, तुषार बोरसे, मधुकर चौधरी , कुणाल पवार, प्रकाश पाटील, संजय पाटील, एम. ए. पाटील , आर. जे. पाटील, कुणाल पवार, प्रभूदास पाटील, ईश्वर महाजन, सुनील वाघ, आशिष पवार, निलेश विसपुते आरोग्य विभागाचे डॉ गिरीश गोसावी, किशोर माळी, अविनाश चव्हाण, प्रमोद पाटील, पंचायत समितीचे जितेंद्र पवार, के. टी. पाटील , बी. जे. बाविस्कर, मिलन शिंपी, अनिल पाटील, एल. डी. चिंचोरे, आशा ठाकूर, नगरपालिकेचे प्रसाद शर्मा, सोमचंद संदानशीव, महेश जोशी ,अनिल बॅंडवाल , किशोर संघेले, राधा नेतले , अविनाश संदानशीव , बिंदू सोनवणे , महिला कर्मचारी पाकिजा पिंजारी , दीपाली पवार, ललिता गवळी , रुपाली पवार , सीमा पाटील ,गायत्री पाटील , मनीषा गवते ,मंगला पाटील , रत्नमाला चौधरी ,माधवी निकम यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी नायब तहसीलदार संतोष बावणे , गटविकास अधिकारी विशाल शिंदे , गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देऊन संपाचा इशारा दिला आहे.

प्रोटानतर्फे तहसिलदार विभागाला निवेदन

सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी विभागात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या अमळनेर राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन संघाच्या प्रोटान शाखेच्या वतीने संपाच्या पूर्व संध्येला तहसीलदार कार्यालयातील अधिकारी बावणे व सैंदाणे यांना निवेदन देण्यात आले. सरकारने शेतकरी, मजूर, शासकीय तसेच निमसरकारी व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे जगणे हराम केले आहे. अतोनात महागाई, अशक्यप्राय शिक्षण, भांडवलदारांना पोसणारे कायदे करून जनतेचे कंबरडे मोडले आहे. विशिष्ट लोकांना श्रीमंत करणारी नीती देशाला घातक आहे. या विरोधात आरएमबीके संघटना आवाज उठवित आहे. आज हक्काची पेन्शन मिळावी व नविन शैक्षणिक धोरण थांबवावे तसेच खाजगीकरण धोरण बंद करावे यासाठी राष्ट्रीय पातळीवर आरएमबीकेएस अंतर्गत शिक्षकांच्या तसेच सर्व कर्मचाऱ्यांवतीने 13 ते 18 काळीफित लाऊन तसेच सकारात्मक निर्णय होईपर्यंत बेमूदत संप पुकारला आहे. यासंपाबाबत निवेदन देण्यासाठी प्राध्यापक शिवाजी पाटील, संयोजक मिलींद निकम, प्रोटानचे उपजिल्हाध्यक्ष एस. एच. भवरे, तालुका संयोजक डी. ए. सोनवणे, अनिल संदानशिव,अविनाश पवार, फईम पिंजारी, पत्रकार अजय भामरे, वसंत पाटील, विजय गाढे, नूर खाॅ पठाण आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button