मुडी प्र.डांगरी येथे दीड कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते, तलाठी कार्यालय, केटी वेअर कामांचे भूमिपूजन

आमदार अनिल पाटलांच्या उपस्थित कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी प्र.डांगरी येथे दीड कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते, तलाठी कार्यालय, केटी वेअर यासह इतर विकास कामांचा भूमीपूजन सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या भुमीपुजन प्रसंगी गावाचे जेष्ठ नागरिक एच.एल.पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते एल.टी. पाटील, अशोक आधार पाटील, माजी बाजार समिती संचालक विश्वास बाजीराव पाटील, विजय जैन, नाना पाटील, सरपंच काशिनाथ महाजन, सोनू संदानशिव, रामकृष्ण पाटील यांच्या सह गावातील ग्रामपंचायत सदस्य दादा कौतीक पाटील, नारायण पाटील, भानुदास पाटील, योगेश पाटील, गजू महाराज, गुणवंत पाटील, तूषार पाटील, देविवास पाटील, शांताराम पाटील, पंढरीनाथ पाटील, उदय भाऊराव पाटील, महेद्र पाटील, उदय शिंदे, सतिश पाटील, राजु आप्पा पाटील, तुषार सैंदाणे, वाल्मीक चव्हाण, नितीन पाटील, भैय्या सर, अरविंद सर, रामकृष्ण वानखेडे सुमित वानखेडे, पंकज पाटील, राहूल सुर्यवंशी, अनिल सर, युवराज भिल, वसंत भिल, सुपडू भिल्ल, रोहन पाटील, संजू वडर, गुलाब वडर, आर.एम.पाटील , गोकुळ पाटील, भालेराव पाटील, शरद पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव उदय पाटील व प्रणव पाटील यांनी केले. या सोहळ्यास पंचक्रोशीतील बाम्हणे विकासो चेअरमन गणेश भामरे, भिलाली सरपंच राजपुत, दिपक पाटील शहापूर, एकतास प्रशांत पाटील, एकलहरे प्रफुल पाटील, खर्दे सर्जेराव पाटील, शहापूर ग्रां.पं सदस्य कैलाश पाटील आदी उपस्थित होते.

या विकास कामांचे झाले भूमिपूजन

यावेळी तलाठी कार्यालय 25 लक्ष, रोजगार हमी योजने अंतर्गत रस्ता 20 लक्ष, 2515 योजने अंतर्गत रस्ता 10 लक्ष, पाणीपुरवठा योजना 40 लक्ष, सभामंडप 15 लक्ष, वीर एकलव्य स्मारक 7 लक्ष, केटीवेअर बंधारा 25 लक्ष असे एकूण 142 लक्ष च्या कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *