अमळनेर युवा व सार्वजनिक शिवजयंती समितीचा वतीने कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर युवा व सार्वजनिक शिवजयंती समितीचा वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी सैनीक धनराज पटील, विवेक पाटील, अमळनेर युवा मित्र परिवाराचे निखील चव्हाण, तुषार सोनार, चेतन बडगुजर, राहुल कंजर, मनोज शिंगाणे, विक्की चौधरी, विपूल पाटील, मयुर पाटील व इतर युवा उपस्थित होते.
यांचा करण्यात आला सन्मान
प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेऊन पाणी फाऊंडेशन चोपडाई कोंढावळच्या मीना पाटील , कल्पना पाटील व मालुबाई पाटील यांनी गट शेती करून खर्च वाचवून विषमुक्त कापूस पिकवला, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या रेणू प्रसाद , डाॕ. भारती पाटील, आश्विनी भदाणे , दिप्ती गायकवाड, मोहिनी पाटील नंदिनी मैराळे , निकीता पाटील, ज्ञानेश्वरी पटील कल्पना पाटील व राजश्री नेरकर यांनी एच आय व्ही बधितांना मदत, सामाजिक क्षेत्रात सहकार्य , विद्यार्थ्यांना मदत आणि कौटुंबिक समुपदेशन केल्याबाबद्दल तसेच पोलीस प्रशासनाच्या दामिनी पथकातील रेखा ईशी व नम्रता जरे यांनी भरकटलेल्या प्रेमी युगुलांवर कारवाई करून मुलींना वाचवण्याचे काम केले म्हणून अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार अमळनेर युवा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.