अमळनेर (प्रतिनिधी) येथील महिला हाउसिंग ट्रस्ट अमळनेरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त रॅली काढून वृक्षारोपण आणि संवर्धन जनजागृती करण्यात आली
नगरपालिकेपासून ते तिरंगा चौक पर्यंतही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिलांनी झाडे लावा झाडे जगवा पाणी, आडवा पाणी जिरवा आधी घोषणा दिल्या. तसेच जनजागृती केली. नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांनी विशेष दखल घेऊन सर्व महिलांचा सत्कार केला. याप्रसंगी महिला हाऊसिंग ट्रस्टच्या दिपाली भोईटे, आशा पाटील, भारती दाभाडे, स्मिता कोचळे, रूपाली लाड, संध्या मराठे, रूपाली सोनवणे, रूपाली शिंदे, भारती सोनवणे, ललिता वायकर, संगीता बारस्कर, मोहिनी सोनवणे, देवयानी पवार, जयश्री चौधरी यांनी रॅलीचे नियोजन केले. संस्थेचे प्रमुख भारती भोसले आणि योगिता मालूसरे यांनी संस्थेच्या महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनी रॅलीत झाशीची राणी, भारत माता, रमाबाई, प्रतिभाताई पाटील, जिजाऊ यांची वेशभूषा करून भाषणे दिली. याप्रसंगी अमळनेरातील प्रतिष्ठित महिलांनी भेटी देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला.