अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस “जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नारी शक्तीचा जागर करण्यात आला
मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे व उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .जागतिक महिला दिन का साजरा केला जातो याविषयीचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी भाषणे व गाणी शिक्षिकांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केले. महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे यांनीही जागतिक महिला दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.