अमळनेर(प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त अमळनेर विधी सेवा समिती तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचे मार्फत न्यायदान कक्षात शिबीर घेण्यात आले. या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येथील न्यायालयात हे शिबीर झाले शिबीरात जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.आर.चौधरी तसेच दिवाणी न्यायालय ब स्तर पी.पी. देशपांडे, दिवाणी न्यायालय क स्तर एस.एस. अग्रवाल,एस. एस. लजोधळे व श्रीमती.ए.यु यादव यासह सर्व न्यायमुर्ती तसेच सरकारी अभियोक्ता के.आर.बागुल हजर होते.यावेळी न्यायाधीश पी.पी देशपांडे, एस.एस अग्रवाल, जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी तर कर्मचा-याच्या वतीने दिवाणी -न्यायालय ब स्तर येथील लिपिक मराठे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी न्यायालयातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होत्या. कर्मचा-याच्या संघटनेकडुन महिला न्यायाधीश व कर्मचारी यांना भेटवस्तु देवुन त्यांचे महिला दिनानिमित्त स्वागत करण्यात आले.