आदिवासी ठाकूरांची परंपरागत होळी पेटवण्याचा मान महिलांना देऊन नारी सन्मानाचा केला जागर!

‘ होळी रे होळी’ च्या जल्लोषात नवैद्य अर्पण करून पेटवली होळी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा होळी पेटवण्याचा महिलांना देण्यात येऊन नारी सन्मान करण्यात आला. ‘ होळी रे होळी’ च्या जल्लोषात नवैद्य अर्पण करून होळी पेटवली. होळीच्या अग्नीभोवती उत्साही वातावरणात सर्वांनी फेर धरून समस्त मानव जातीच्या कल्याणाची प्रार्थना करण्यात आली.
अमळनेर येथील संत सखाराम महाराजांच्या श्रीराम कॉलनी परिसरातील शेतात वर्षानुवर्षे ठाकूर जमात बांधव होळी सामूहिकपणे साजरी करीत असतात. ठाकूरांच्या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे यंदा होळी समजातील सुवासिनींच्या हस्ते पेटविण्यात आली. पारंपरिक पद्धतीने होळी रचण्यात आली होती. या होळीचा दांडा उंबर झाडाची फांदी उभी करून त्यास पायाशी खोदलेल्या खड्ड्यात गवरी ठेवली जाते. ओल्या झाडांची तोड न करता सामूहिक वर्गणीतून कोरडी लाकडं आणि गवऱ्या तसेच होळीचे पूजा, सजावट साहित्य सामाजिक दातृत्वातून गोळा केली जातात. होळीला रंगबिरंगी पताका, फुगे लावून सजविली होती. जमातीचे अमळनेर प्रमुख दिलीप ठाकूर, राज्याचे सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, दिलीप वानखेडे, गुणवंत वाघ, गुणवंत वाघ, शेखर ठाकूर, अनिल ठाकूर आदिंनी होळीला पुष्पहार हारडा हार कंगन अर्पण करून पूजन केले. होळीला उपस्थित महिला मंडळाच्या पदाधिकारी सौ.अपेक्षा पवार, सौ.मिना ठाकूर, सौ.रेखा ठाकूर, सौ.स्वाती ठाकुर, सौ. मंगल ठाकूर, स्वप्ना ठाकूर, पूनम ठाकूर, कल्याणी सूर्यवंशी, आदिती ठाकूर आदिंनी विधिवत अग्नि देऊन ‘ होळी रे होळी’ च्या जल्लोषात होळीला नवैद्य अर्पण करून होळी पेटवली. होळीच्या अग्नीभोवती उत्साही वातावरणात फेर धरण्यात आला. याप्रसंगी रविंद्र वानखेडे, प्रकाश ठाकूर, विजय ठाकूर, सुखदेव ठाकूर, निलेश वाघ, उमेश ठाकूर, यशवंत सूर्यवंशी, उमाकांत ठाकूर, सुरेश ठाकूर, दिपक ठाकूर, किरण सूर्यवंशी, गजानन ठाकूर, हिम्मत ठाकूर, रमेश ठाकूर, भूषण ठाकूर, विवेक सूर्यवंशी, जयेश ठाकूर आदिंसह मोठ्यासंख्येने ठाकूर समाजाचे लोक उपस्थित होते.

होळीचा प्रसाद म्हणून गुळाची जिलेबी वाटप

पाच दिवसीय होळीचा शिमगा उत्सव साजरा करण्याची परंपरेत होळीचा मुख्य सण शहरी वातावरणात जोपासण्याचा प्रयत्न ठाकूरांच्या सामूहिक होळीतून होत असतो. याप्रसंगी होळीचा प्रसाद म्हणून गुळाची जिलेबी सर्वांना वाटण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *