पाण्याची नासाडी टाळून व पाणी बचतीचा विद्यार्थ्यांनी दिला संदेश
अमळनेर (प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथील पूर्व प्राथमिक , प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
सृजनाचे प्रतीक असलेल्या वसंत ऋतूमध्ये येणारा होळी हा सण सर्वत्र ६ मार्च रोजी साजरा केला जातो व दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते मात्र रंगपंचमीला वापरात येणारे रासायनिक रंग त्वचा व आरोग्यासाठी घातक असतात हे लक्षात घेऊन नैसर्गिक व कोरड्या रंगाचे होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली व पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे व उप मुख्याध्यापक विनोद अमृतकर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे यांनी होळी सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनीही होळी सणाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पर्यावरणाला व निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ न देता पाणी न वापरता नैसर्गिक कोरडा रंग वापरून इको फ्रेंडली होळी साजरी केली.