अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी भर दिवसा दुपारी सोने व रोकड मिळून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना झाल्याची घटना दि.7 रोजी शहरातील पाटील कॉलनी भागात घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दीपक जगन्नाथ सूर्यवंशी (रा.प्रभूरंग रेसिडेन्सी पाटील कॉलनी) हे दि.7 रोजी दुपारी शालकाच्या लग्नानिमित्त कुटूंबासह पैलाड परिसरात गेले होते.तेथून दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांची आई घरी परत आली असता त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले.अज्ञात चोरट्याने घरातील 35 ग्रॅम वजन असलेली 80 हजार 500 रुपयांची सोन्याची माळ,10 ग्रॅम वजनाचा 23 हजार रुपयांचा सोन्याचा शिक्का,साडे सहा ग्रॅम 14 हजार 950 रुपयांचे सोन्याचा दागिना,28 हजार रुपये रोख,तर दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले सहा हजार रुपये रक्कम असा एकूण 1 लाख 52 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.