अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
या सोहळ्यासाठी डॉ. निशा जैन, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद पिंगळे, जास्मिन भरूचा , आचल अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे व उप मुख्याध्यापक विनोद अमृतकर पाहुणे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुरुवात विशेष परिपाठाने करण्यात आले होते. त्याद्वारे जागतिक विज्ञान दिनाविषयी चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. यात पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा सहभाग होता .या दिवशी विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिके , वादविवाद स्पर्धा ,यासारखेच बरेच उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांचे प्रयोग बघण्यासाठी पालकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पूर्व प्राथमिक स्तरावरील चिमुकल्यांनी अतिशय उत्कृष्ट असे विज्ञान प्रदर्शन भरविले होते. डॉ. सौ निशा जैन व श्री. प्रमोद पिंगळे यांनी विज्ञान प्रदर्शनाचे निरीक्षण केले व चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केले. त्यानंतर इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक प्रशांत मालुसरे यांनी विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले. त्यानंतर इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लायन्स मेंबर्स जस्मिन बरूचा व आचल अग्रवाल यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून भरभरून कौतुक केले .त्यानंतर माध्यमिक स्तरावरील इयत्ता सहावी ,इयत्ता सातवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वाद विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जस्मिन भरूचा व रशिदा जावेद यांनी निरीक्षण केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, सचिव सितीका अग्रवाल, ममता अग्रवाल, व आचल अग्रवाल यांनी उपक्रमाचे कौतुक केले.