खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

साने गुरुजी विद्या मंदिरात विज्ञान दिनानिमित्त भरवले विज्ञान प्रदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील साने गुरुजी विद्या मंदिरात विज्ञान दिनानिमित्त छोटेखानी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यात पाचवी ते सातवी च्या बालवैज्ञानिकांनी सहभाग घेत विविध मॉडेल मांडली. तत्पूर्वी एस. एम. गोरे सभागृहात वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, अॅड.अशोक बाविस्कर, गोकुळ पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील उपस्थित होते. यावेळी मयूर पाटील, भार्गवी देसले, हिमांशू पाटील यासह इतर विद्यार्थ्यांनी विज्ञान दिन आणि भारतीय शास्ज्ञन यांची माहिती सांगितली सूत्रसंचालन एस. ए. पाटील यांनी केले तर आभार पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button