अमळनेर (प्रतिनिधी). मराठी गौरव भाषा दिनानिमित्त एकपात्री प्रयोग कार्यक्रम झाला.शहरातील एव्हरग्रीन सिनियर सिटीजन्स क्लब या सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत माहिती अशी की, २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त येथील टाऊयान हॉल येथे पू.ल.देशपांडे लिखित व्यति आणि वल्ली या कथासंग्रहालयातील “अंतुबर्वा” या गाजलेल्या व्यक्तिरेखेवर डॉ.सुहास देशमाने यांनी एकपात्री प्रयोगातून व्यक्तिरेखा साकारली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्लबचे अध्यक्ष मा.डॉ. सुहास देशमानें व कार्याध्यक्ष प्रा. अरविंद फुलपगारे यांच्या शुभहस्ते पु.ल. देशपांडे व कवीवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी डॉ.देशमाने यांनी सर्व पात्रांशी एकरूप होत प्रभावीरित्या अभिनय केला.श्रोत्यांच्या मनात, ह्दयात अभिनय पोहचत होता. अभिनय कौशल्यामुळे श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध झाला. विशेष म्हणजे डॉ. सुहास देशमाने यांनी वेशभूषा करून एकपात्री प्रयोग सादर केला. क्लबचे सचिव प्राचार्य- डॉ. एस. आर. चौधरी यांनी सूत्रसंचलन केले.प्रा.फुलपगारे यांनी आभार मानले.