अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असतांनाच डॉल्बी व बँड च्या कर्कश आवाजामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या ग्रामीण व शहरी भागात लग्नसराई जोरात सुरू आहे.तर दुसऱ्या बाजूला दहावी व बारावीच्या परीक्षा देखील सुरू झाल्या आहेत.मात्र ऐन या परीक्षांच्या अभ्यासावेळी कॉलनी तसेच ग्रामीण भागात हळद,लग्न समारंभ,धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी वाजणाऱ्या डॉल्बी,बँड तसेच लाऊडस्पीकर मुळे विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत.काही ठिकाणी लग्न दहा दिवसांवर असले तरी रोज रात्री स्पिकर लावून गाणे वाजवले जात आहेत.अनेक भागात मध्यरात्री पर्यंत हा धुमधडाका सुरूच असतो यामुळे मात्र विद्यार्थ्यांनसोबतच सामान्य नागरिकांना त्रास होतोय.यावर बंदोबस्त व्हावा ही मागणी पालक,विद्यार्थी व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी माध्यमिक पतपेढी संचालक तुषार बोरसे , माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष संजय पाटील , शिक्षक भारती जिल्हा कार्याध्यक्ष आर जे पाटील ,टी डी एफ तालुकाध्यक्ष सुशील भदाणे सचिव राहुल बहिरम यांनी केली आहे.