अमळनेर (प्रतिनिधी) येथील महावीर नागरी सहकारी पतपेढीची संचालक आणि चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध होऊन चेअरमनपदी प्रकाशचंद हिरालाल पारख यांची वर्णी लागली आहे. तर व्हा.चेअरमनपदी कल्पना कैलास जैन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रकाशचंद पारेख हे 2010 पासून सलग व त्याआधी 5 वर्ष असे एकूण 17 वर्षांपासून पतपेढीच्या चेअरमन पदी कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पतपेढीची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने पुन्हा त्यांनाच चेअरमन पदी विराजमान करण्यात आले.गांधली ग्रामपंचायतचे 15 वर्ष सदस्य, वि. का सोसायटी चे माजी सदस्य, खा शि मंडळाचे माजी विश्वस्थ,अमळनेर जैन ओसवाल समाजाचे माजी अध्यक्ष, जळगाव जैन बोर्डिंग चे संचालक आदी पदांवर त्यांनी काम केले असून सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचे विशेष योगदान असते.इतर पतसंस्था डबघाईला गेल्या असताना त्यांच्या सह संचालक मंडळाच्या पारदर्शी कारभारामुळे शहरातील लहान मोठ्या व्यापारी बांधवाना आजही येथून सुरळीत पत पुरवठा होऊ शकत आहे. याआधी सदर पतपेढी ची संचालक मंडळाची निवडणूक दि 18 फेब्रुवारी 2023 रोजी बिनविरोध झाली होती त्यात प्रकाशचंद हिरालाल पारख, मोहनलाल रामलाल जैन,सुभाषचंद्र योगराज जैन,शांतीलाल मोतीलाल पारख,प्रविण इंदरचंद जैन,महेंद्र मिश्रीलाल कोठारी,संजय तुकाराम भोई,शेंनपडू दामू पाटील,अशोक वना बाविस्कर,लीला प्रकाश छाजेड आणि कल्पना कैलासचंद जैन आदी संचालक बिनविरोध निवडून आले होते.त्यातून चेअरमन आणि व्हा चेअरमन पदाची निवडणूक दि 1 मार्च रोजी पतपेढीत पार पडली. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.सर्वांच्या सहमतीने चेअरमन पदी प्रकाशचंद पारख आणि व्हा चेअरमन पदी कल्पना जैन यांची निवड झाल्याने सर्वांनी अभिनंदन करून सत्कार केला.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहकार अधिकारी विवेक जगताप होते त्यांना पतपेढी चे सचिव प्रेमचंद रमेशलाल जैन,लिपिक पराग जैन,मुकेश पारख,बाळू पाटील,अनिल जैन,विजय जैन,दिलीप पाटील यांचे सहकार्य लाभले.याप्रसंगी धर्मेंद्र कटारिया, सुशील पारख,पिंटू महाजन यासह सभासद व व्यापारी बांधव उपस्थित होते.