अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी अँनस् क्लब तर्फे संचलित आदिवासी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शहरातील मुंदडा पार्क व राम मंदिर येथे दर्शनासाठी शैक्षणिक सहल काढण्यात आली होती. त्यावेळी मुलांनी मनसोक्त आनंद लुटला.
या प्रसंगी सकाळी बालगोपालांनी मुंदडा पार्क येथे विविध खेळणींवर खेळून खूप आनंद लुटला. दुपारी श्रीमंत प्रताप शेठजींनी बांधलेल्या प्रताप महाविद्यालया समोर राम मंदिर येथे दर्शनासाठी घेऊन गेले होते.विद्यार्थ्यांना राम मंदिर बद्दल माहिती सांगण्यात आली. निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांना स्वरूची भोजन देण्यात आले.
या अगोदर दिनांक २६फेब्रुवारी रोजी रोटरी डिस्टिक गव्हर्नर डॉ. आनंद झुंझुनवाला यांनी सुद्धा रोटरी अँनस् क्लब संचलित आदिवासी विद्यार्थ्यांची प्राथमिक शाळेला भेट दिली होती व सर्व सदस्यांचे भरीव योगदान बद्दल व करीत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. हे कार्य निरंतर आपण चालू ठेवाल अशी अशा त्यांनी व्यक्त केली. गेल्या वीस वर्षापासून रोटरी अंनस् क्लब अमळनेरच्या भगिनी विद्यार्थ्यांना दररोज जेवण व आवश्यक लागणाऱ्या पाठ्यक्रमाच्या वह्या पुस्तके नियमित प्रमाणे देत आहे .पुढील माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक व इतर जबाबदारी उचलत असतात. आदिवासी विद्यार्थ्यांनी शिकून पुढे यावे व त्यांचे राहणीमान उंचावे याकरता रोटरी अँनस् क्लब विशेष प्रयत्न करीत आहे व त्याला आता मोठ्या प्रमाणावर यश मिळत आहे.
शिक्षिका कोष्टी यांचा केला सत्कार
महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षिका कोष्टी यांना विद्यार्थी घडविण्यात घेतलेल्या कष्टाचे कौतुक करण्यात आले आणि क्लब तर्फे साडी व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.सदर विद्यार्थ्यांच्या सहली करिता रोटरीअन्स क्लबच्या प्रेसिडेंट शिल्पा सिंघवी, सेक्रेटरी.ममता जैन, ट्रेझरर मेहराज बोहरी, सीनियर सदस्य सौ उज्वला मणियार, भावना जीवनानी , वनश्री अमृतकर, पूर्वा वशिष्ठ, रूपल गोसलिया आदी यांनी सदर सहल यशस्वी होणे करिता विशेष प्रयत्न घेतले. याप्रसंगी स्कूलबसची सेवा सरस्वती विद्यालयाद्वारे मिळाली. मुख्याध्यापक रणजीत शिंदे यांचे विशेष सहकार्य मिळाले अशी माहिती मकसूद बोहरी कळवितात.