कष्टाने संसार फुलवत असतानाच प्रसूती होऊन बाळ दगावले तर अति रक्तस्रावाने आईचाही दुर्दैवी मृत्यू

पाडळसरे येथील घटना , गावावर पसरली शोककळा

अमळनेर (प्रतिनिधी) कष्टाने संसार फुलवत असतानाच घरात नव्या पाहण्याचे स्वागत करण्याचा आनंद असतानाच प्रसूती होऊन बाळ दगावले तर अति रक्तस्रावाने आईचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील पाडळसरे येथे घडली. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पाडळसरे येथील हात मजुरीनवर उदरनिर्वाह करणाऱ्या गर्भवती जागृती अनिल कोळी वय २२ यांना प्रसवकळा सुरू होताच काल दिनांक २७ रोजी दुपारी मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले ,तेथून डॉक्टरांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्यावर आज दिनांक २८ रोजी दुपारी ४ वाजता जागृतीची प्रसूती करण्यात आली. मात्र जन्माला आलेले स्त्री जातीचे बाळ दगावले व जागृतीला प्रसूती नंतर रक्तस्राव सुरू झाल्याने तिला धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते , मात्र धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा रक्तस्राव अति झाल्याने तेथे मृत्यू झाल्याने जन्माला आलेले बाळ व जागृतीच्या मृत्यूची वार्ता गावाला आल्याने एकच शोककळा पसरली.

सुखी संसार करणारे दाम्पत्य

स्वतः मजुरी करत इतरांना ही रोजगार उपलब्ध करून सामूहिक गटाने संचालन करणारा अनिल तुकाराम कोळी व त्याचा दिमतीला हात मजुरी करून हातभार लावणारी जागृती ही काल पर्यंत तिने कष्ट घेत सुखी संसार करणारे दाम्पत्य म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख गावात निर्माण केली होती , अल्पशा आजाराने आईवडील गमावलेल्या अनिल कोळीच्या संसार थाटण्यासाठी बाम्भोरी ता धरणगाव येथील माहेर असलेल्या जागृतीने अनिल कोळी यांचाशी दोन वर्षांपूर्वी विवाह करून मजुरीवर तीन दुभत्या गायी घेऊन दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून घरी आल्यावर गायींना चारा आणून दुधाचा जोड व्यवसाय सुरू केला होता.

गावात एकाही घरात पेटली नाही चूल

दोनच वर्षात जागृतीने अनिल कोळीचा संसार फुलवून वेल बहरत असतानाच बाळाचा जन्म होताच बाळ दगावले व जागृतीचाही अति रक्तस्राव होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गाव हळहळले , गावात एकाही घरात चूल पेटली नाही. मृत जागृतीच्या पश्चात पती , चुलत सासरे व दोन नणंद असा परिवार आहे , धुळे शहर पोलीस ठाण्यात अनिल कोळीचा फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *