शेतकर्‍यांनी शेतकी संघाबाहेर रात्र काढली जागून, तर एका तासात ६०० शेतकऱ्यांची नोंदणी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पन्नास शेतकऱ्यांनी ना डासांची , ना गटारीच्या दुर्गंधीची पर्वा करता शेतकी संघाबाहेरच रस्त्यावर गटारीच्या बाजूला कलतान टाकून अर्धवट जागत २८ रोजी रात्र काढली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी एका तासात ६०० शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली.
बाजार भावापेक्षा शासकीय खरेदीत दोन पैसे जास्त मिळतील या अपेक्षेने प्रथम नोंदणी करण्यासाठी शेतकर्‍यांनी गर्दी केली होती. बाजारात हरभऱ्याला ४१०० ते ४२०० रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळतो मात्र नाफेड च्या शासकीय खरेदीत ५ हजार ३३५ रुपए भाव जाहीर झाल्याने पोटासाठी दोन पैसे जास्त मिळतील या अपेक्षेने नोंदणीची नोटीस जाहीर होताच २८ रोजीच शेतकऱ्यांनी शेतकी संघाबाहेर रस्त्यावर गटारीच्या शेजारीच बस्तान मांडले होते. सुरुवातीला नम्बर लावला नाही तर व्यापारी गर्दी करतात किंवा शासकीय खरेदी बंद होते म्हणून शेतकरी एका कागदावर क्रमाने नाव लिहून त्याच ठिकाणी क्रमवार कलतान टाकून लोळले होते. नम्बर मागे पुढे होऊ नये म्हणून रात्रभर अर्धवट जागरण करीत रात्र काढली.

क्रमवारी टोकन देऊन केली नोंदणी

शासनाने हेक्टरी साडे तेरा क्विंटल मर्यादा जाहीर केली आहे. सकाळी आठ वाजता नोंदणीला सुरुवात झाली. आणि शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली. शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी क्रमवारी टोकन देऊन कागदपत्रे जमा करून घेतली. त्यांनतर कार्यालयात संगणकावर ऑनलाईन नोंदणी केली. १ रोजी सकाळी ८ ते ९ या एका तासाच्या वेळेत तब्बल ६०० जणांची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *