खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

३०३० चे डिस्टिक गव्हर्नर डॉ.आनंद झुंझुनुवाला यांनी भेट देऊन रोटरी क्लब अमळनेरचे केले विशेष कौतुक

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्टिक गव्हर्नर डॉ.आनंद झुंझुनुवाला यांनी रोटरी क्लब अमळनेरला भेट देऊन कामाचे कौतुक केले.
सकाळच्या सत्रात त्यांनी रेल्वे या रोटरीच्या प्रकल्प अंतर्गत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनीसाठी असलेला इंटरॅक्ट क्लब सोबत त्यांनी हितगुज केले. दुपारी त्यांनी रोटरी संचलित आदिवासी स्कूल व मंगल ग्रह येथे रोटरी बालोद्यानास भेट दिली. संध्याकाळच्या सत्रात असिस्टंट गव्हर्नर नितीन अहिरराव यांनी डिस्टिक गव्हर्नर यांच्या परिचय करून दिला.पब्लिक मिटींगला संबोधित करताना आपल्या संभाषणात त्यांनी सांगितले की अमळनेरची भूमि ही पवित्र संत सखाराम महाराजांची संतभूमी व साने गुरुजींची कर्मभूमी आहे.या भूमीला भेट देत असताना मला अतिव आनंद होत आहे. ६७ वर्षांची उज्वल परंपरा असलेल्या रोटरी क्लब अमळनेर निरंतर समाजाभिमुख व अतिशय शिस्तबद्ध नियोजनाने प्रकल्प राबवीत असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. आदिवासी मुलांसाठी असलेली प्राथमिक शाळा व मंगलग्रह मंदिर येथील रोटरी बालोद्यान व मॅचिंग ग्रँड अंतर्गत सरस्वती शाळेला दिलेली स्कूल बस आदि प्रकल्पांचे त्यांनी प्रशंसा केली. यावर्षी प्रथमच रोटरी उत्सवाचे जोरदार यशस्वी पूर्ण आयोजनाने आपल्या रोटरी क्लब अमळनेरच्या मानात शिरा रोवलेला आहे, ही क्लब करता अभिमानाची बाब आहे.यावर्षी सुद्धा मॅचिंग ग्रँट अंतर्गत मोठा प्रकल्प क्लबने राबवावा त्यासाठी आपण भरघोस मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले. रोटरी इंटरनॅशनल ही सेवाभावी संस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात विविध सर्वोत्तम सेवा प्रकल्प राबवीत असल्याचे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले . पोलिओचे जगातून संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी बिलगेट व मिरांडा फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने व इतर सेवाभावी संस्थेच्या मदतीने अथक प्रयत्नाने रोटरीने संपूर्ण जगभर पोलीओ निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न करून २० -२५ वर्षापूर्वी दरवर्षी ३.५ लाख हे पोलिओग्रस्त मुलं असायची ती आता ९९.९ दर इतके कमी झालेले आहे आणि २०२४ पर्यंत हे संपूर्ण १००% निर्मूलन शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपणही रोटरी फाउंडेशनला उदार हाताने मदत करून त्यांच्या विविध मानवी प्रकल्पास हातभार लावू शकतात असे त्यांनी आव्हान केले.

विविध विषयात प्रथम आलेल्या मुलांचा गौरव

याप्रसंगी मान.डिस्टिक गव्हर्नर यांच्या हस्ते यशवंत विद्यार्थ्यांचे विविध विषयात प्रथम आलेल्या व त्यांनी मिळविलेल्या विशेष नैपुण्य मिळविल्याबद्दल कौतुक करण्यात आले . रोटरी परिवारातील दिवंगत सदस्य कै. आर. के. केले , कै. हिरालाल सिंघवी ,कै. महेश महेश्वरी, कै. दिनेश संकलेच्या, कै. विनायक पिंपळीकर कै. श्यामदास लुल्ला यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांतर्फे विद्यार्थ्यांना रोख व प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच या यावर्षी रोटरी फाउंडेशनला भरघोस मदत करून पीएचएफ हे पद त्यांना बहाल करण्यात आले.त्यात सर्वश्री सेक्रेटरी रोट.ताहा बुकवाला,रोट. अहमद बुऱ्हानी, रोट भूपेंद्र जैन, रोटे जयकिसन (धीरज) अग्रवाल व रोटे रोनक संकलेचा या पाच सदस्यांच्या सत्कार मा. डिस्टिक गव्हर्नर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच याप्रसंगी प्रेसिडेंट कीर्तीकुमार कोठारी यांनी रोटरी वर्षात आतापर्यंत राबविलेल्या प्रकल्पांची माहिती पीपीटी द्वारे दाखवण्यात आली

पिंगळवाडे शाळेत प्युरिफायरचा संच भेट

रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने झेडपी स्कूल पिंगळवडे यांना आर ओ प्युरिफायरचा संच देण्यात आला. याप्रसंगी रोटरी डिस्टिक सेक्रेटरी रोटे. राजीव नथानी, असिस्टंट गव्हर्नर रोटे नितीन अहिरराव , डिस्टिक गव्हर्नर यांच्या धर्मपत्नी रो मोनिका झुंझुनुवाला, रश्मी अहिरराव, लायन्स क्लबचे सभासद व मोठ्या प्रमाणावर रोटरी कुटुंबीय नागरिक बंधू-भगिनी व पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन रोटे अजय रोडगे व सौ. निसरीन बुकवाला यांनी केले तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी रोट ताहा बुकवाला यांनी केले. अशी माहिती पी आर ओ रोट मकसूद बोहरी व रो आशिष चौधरी यांनी कळवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button