खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

साने गुरुजी विद्या मंदिराच्या मुलांची शिर्डी साईतीर्थ आणि वॉटर पार्क सहल उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेची शैक्षणिक सहल शिर्डी साईतीर्थ आणि वॉटर पार्क येथे झाली. सहलीत चौथी ते सातवी चे शंभर विद्यार्थी सहभागी झाले.
शिर्डी येथे मालपाणी उद्योग समूहाच्या सहकार्याने साकारण्यात आलेल्या साई तीर्थ येथे भारतातील सर्व धार्मिक स्थळांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. तर लंकादहन या थ्रीडी शो मधून रामायण काळातील तत्कालीन घटना विद्यार्थ्यांसमोर उभ्या राहिल्या. धार्मिक पर्यटना नंतर विद्यार्थ्यांनी वॉटर पार्कचा आनंद लुटला .सहलीला निघण्यापूर्वी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एस टी महामंडळाच्या दोन बसेसची पूजा केली यावेळी मुख्याध्यापक शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहलीचे नियोजन मनोज पाटील यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button