गेल्या अनेक वर्षांपासून परिस्थिती अभावी गॅस पासून वंचित असलेल्या आपल्या प्रभागातील महिलांना कर्तव्यदक्ष नगरसेवक नरेंद्र चौधरी व माजी नगराध्यक्षा भारती चौधरी यांनी उज्वला गॅस योजनेंतर्गत केवळ 100 रुपयात गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले,नुकतेच एका छोट्याखानी कार्यक्रमात याचे वितरण देखील करण्यात आले, दिवाळी सण तोंडावर असताना हे गॅस कनेक्शन सामान्य कुटुंबांना मिळाल्याने हि घरे धुरमुक्त होणार असून यामुळे महिला भगिणींचे आरोग्य देखील सुरक्षित राहणार आहे, बंगाली फाईल भागासह आपला संपूर्ण प्रभाग धुरमुक्त व प्रत्येक घर गॅसयुक्त करण्याचा संकल्प नरेंद्र चौधरीचा असून यासाठी त्यांचा जोमाने पाठपुरावा सुरु आहे