खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे जय भवानी जय शिवाजीचा केला जयघोष

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यानी जय भवानी जय शिवाजी असा जय घोष केला.
मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे व उप मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख पटवून देण्यासाठी विविध भूमिका सादर केल्या, तेव्हा शाळेच्या प्रवेशद्वारापासून घोड्यावर स्वार होऊन शिवाजी महाराज यांची मिरवणूक, पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा भगवे वस्त्र हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी -शिक्षक वृंद छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर प्रेम व अभिमान व्यक्त केला. शिवाजी महाराजांच्या कार्याविषयीची ओळख पटवून देणारी भाषणे, पोवाडे ,अफजलखानाचा वध, माय मराठी नृत्य इत्यादी कार्यक्रम शिवप्रेमी विद्यार्थ्यांनी सादर केली. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताट करून सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली त्याचा आदर्श तरुण पिढीने घेतला पाहिजे असे शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे यांनी सांगितले. विनोद अमृतकर यांनीही शिवाजी महाराजांच्या कार्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नंदिनी देशपांडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button