अमळनेर (प्रतिनिधी) महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थचालकांने समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ केल्याने शाहू महाराज प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापकवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुख्याध्यापक नरेंद्र अहिरराव (वय ४५) याने महिला कर्मचारीला अश्लील शब्दात शिवीगाळ केली म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार अमळनेर पोलिसात दिल्यावरून ऍट्रोसिटी चा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास डीवायएसपी राकेश जाधव करीत आहेत.