वैद्य अन् भंडारी कुटुंबाच्या दातृत्वाने उभे राहिले अडिच लाखांचे केंद्र
अमळनेर(प्रतिनिधी) येथील भंडारी व वैद्य परिवाराच्या आर्थिक मदतीतून खान्देश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूलमध्ये अवकाश निरीक्षण केंद्राची उभारणी करून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी होते.
कै.रघुनाथ भंडारी यांच्या स्मरणार्थ तेजस्विता भंडारी-वैद्य यांच्या सौजन्याने अवकाश निरीक्षण केंद्राचे उदघाटन खा.शि.मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १७ रोजी पार पडले. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्योपाध्यक्ष तथा शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, सेक्रेटरी ए. बी. जैन, माजी अध्यक्ष विवेकानंद भांडारकर, प्राचार्य एम. एस. वाघ, शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम, केंद्राचे देणगीदार प्रसाद वैद्य, उषा रघुनाथ भंडारी,तेजस्विता भंडारी-वैद्य,कुलश्री भंडारी, गणेश सांगळे, विश्रांत कुलकर्णी, प्रदीप भंडारी, संदीप भंडारी, विशाल कुंभारे, आर. एल. माळी, सी. एस. पाटील, एस. बी. निकम आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर यांनी केले. सूत्रसंचलन आर.जे.पाटील यांनी केले. आभार ए.ए.पाटील यांनी मानले. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून उपशिक्षक एस.आर.पाटील व जी.एस.चव्हाण हे यापुढे काम पाहणार आहेत.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
विशाल कुंभारेंनी खगोलीय घटनांची दिली माहिती
यावेळी रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटी लंडन चे सहकारी तथा थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे शिष्य विशाल कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना अवकाश, ग्रह, तारे तसेच त्यासंबंधी घडणाऱ्या खगोलीय घटनांची माहिती दिली. याप्रसंगी देणगीदार तेजस्विता भंडारी-वैद्य,उषा भंडारी,कुलश्री भंडारी यांनी या उपक्रमातून शाळा व संस्थेप्रती असलेली दातृत्वाची संकल्पना मांडली.शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे यांनी आपल्या भाषणातून अवकाश निरीक्षण केंद्र म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीचे पाऊल असल्याचे सांगितले.
अडीच लाख रुपये खर्चून उभारणी
या उपक्रमामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून नाशिक विभागातील अवकाश निरीक्षण केंद्र असलेली पहिली शाळा असल्याचा बहुमान शाळेला प्राप्त झाला आहे. जवळपास अडीच लाख रुपये खर्चून हे अवकाश निरीक्षण केंद्र उभारण्यात आले असून यात अत्याधुनिक दुर्बिणीचा समावेश असून त्यातून शुक्र,मंगळ, गुरू तसेच इतर ग्रह आपण सहजरित्या पाहू शकतो.