आयएमएच्या राज्य कमिटीवर डॉ.हिरा बाविस्कर यांना संधी

राज्य कमिटीवर अमळनेरला प्रथमच मिळाला बहुमान

अमळनेर (प्रतिनिधी) आयएमएच्या मेडिकोलीगल राज्य कमिटीवर अमळनेरच्या डॉ.हिरा शरद बाविस्कर यांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. प्रथमच अमळनेर तालुक्यास हा बहुमान मिळून थेट राज्य कमिटीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
संपूर्ण भारतातील एमबीबीएस व त्यापेक्षा उच्च पदवी प्राप्त असणाऱ्या डॉक्टरांची आयएमए ही संघटना असून ही संघटना डॉक्टरांच्या हितासह भारत सरकारला वेळोवेळी गाईडलाईन देणे, आरोग्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करणे, आणि जिथे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असतील तेथे सरकारला मदत करणे आदी कार्य करीत असते. कोरोना काळात देखील फ्रंटलाईन वर या संघटनेचे कार्य होते. याच आयएमए संघटनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य स्तरावर स्वतंत्र मेडिकोलीगल कमिटी असून यात राज्य भरातील १३ तज्ञ डॉक्टरांचा समावेश होत असतो. नुकतीच ही कमिटी आयएमए महाराष्ट्र स्टेट यांनी जाहीर केली असून यात अमळनेर येथील डॉ.हिरा शरद बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ हिरा बाविस्कर यांनी एमबीबीएस, एम डी पॅथ. नंतर काही दिवसांपूर्वीच एल एल बी पदवी देखील गेल्या वर्षी प्राप्त केली आहे. त्याच मुळे त्यांना थेट या राज्य कमिटीत काम करण्याची संधी देण्यात आली आहे. स्टेट सेक्रेटरी डॉ.संतोष कदम यांच्याकडून नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. डॉ. हिरा बाविस्कर या अमळनेर येथील शिवम पॅथॉलॉजीच्या संचालिका असून कस्तुरबा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांची थेट मेडिकोलीगल राज्य कमिटीत नियुक्ती झाल्याने त्यांचे अमळनेर आयएमए अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, सेक्रेटरी डॉ. संदीप जोशी, सहसेक्रेटरी डॉ. प्रशांत शिंदे, तसेच डॉ. बी. एस. पाटील, डॉ. अनिल शिंदे, डॉ. रवींद्र कुळकर्णी, डॉ. मंजिरी कुळकर्णी, डॉ. ओस्तवाल, डॉ. अनिल हजारे, डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. नितीन पाटील, डॉ. सचिन हजारे, डॉ. किरण बडगुजर, डॉ. राहुल मुठे, डॉ. प्रकाश ताडे, डॉ. जि. एम. पाटील, डॉ. विनोद पाटील, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. विक्रांत पाटील, डॉ. भूषण पाटील, डॉ. दिनेश पाटील, डॉ. सुमित सूर्यवंशी, डॉ. स्वप्ना पाटील, डॉ. मनीषा भावे, डॉ. मयुरी जोशी, डॉ. प्राजक्ता बहुगुणे, डॉ. दीपक धनगर, डॉ. मनीषा पाटील, डॉ. उर्वी जोशी, डॉ. प्रियंका पाटील यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *