अमळनेर (प्रतिनिधी) आधीच विविध आजारांनी त्रस्त त्यात अंबिलिकल हार्नियाचा आजार जडून अत्यवस्थ झालेल्या ७७ वर्षीय वृद्धाची प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे यांनी अतिशय कठीण शस्त्रक्रिया यशस्वी करीत रुग्णास जीवदान दिले.
विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करताना इतर आजारांमुळे रुग्णाला संपूर्ण भूल देणे धोकेदायक असल्याने डॉ. शिंदे यांनी स्वतःचे कौशल्य वापरून भुलतज्ञ डॉक्टरांच्या मदतीने जागेवरच लोकल भूल देऊन ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. भागवत परशुराम बारी असे जीवदान मिळालेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांना अंबिलिकल हार्निया(नाभी) मध्ये लहान आतडीचा भाग अडकल्याने ते अत्यवस्थ झाले. जीवाला धोका निर्माण होणारीच ही परिस्थिती असताना त्यांना अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशनमध्ये भरती करण्यात आले,त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया होणे अत्यंत आवश्यक होते परंतु मधुमेह, रक्तदाब,हृदयाचा आजार,जलोदर(असायटीज),प्रोस्टेट ग्रंथी,हाय थाईसोडोल आदी आजार असल्याने त्यांना शस्त्रक्रिया करताना संपूर्ण भूल देणे धोके दायक होते,तेव्हा रुग्णास तेवढीच आजूबाजुची जागा बधिर करून भूल देण्यात आली,यावेळी भुलतज्ञ डॉ प्रांजल विनोद पाटील यांनी वेळोवेळी नाडीचे ठोके तपासून मदत केली,अखेर दीड तासात ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊन रुग्णाचा जीव वाचला.चार दिवसांनी रुग्णांची सुखरूप पणे सुटी करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांना डॉ. संदीप जोशी, डॉ. परेश पाटील, डॉ. अलीम शेख, डॉ हर्षल संदानशिव,संदीप पाटील,निलेश पारधी, सारा तडवी यांचे सहकार्य लाभले.
तर रुग्ण वाचू शकतो
अनेक आजार असताना पूर्ण भूल शक्य नसल्याने लोकल भूल देऊन ऑपरेशन केले, योग्य वेळी काळजीपूर्वक ऑपरेशन केल्यास रुग्ण नक्कीच वाचू शक
डॉ. अनिल शिंदे
..म्हणून मी आज सुखरूप
या आजारामुळे मला जेवण जात नसल्याने मी धुळ्यात देखील उपचार घेतले, मात्र फरक पडत नसल्याने डॉ. अनिल शिंदे यांच्या कडे दाखवले, त्यांनी योग्य निदान करून त्वरित ऑपरेशन केल्याने आपण सुखरूप असल्याचे रुग्ण भागवत बारी यांनी सांगितले.