अमळनेर (प्रतिनिधी) शाळेत शालेय पोषण आहार शिवणाऱ्या महिलेस शिवीगाळ करून व उपाध्यक्षला मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पैलाड भागात असणाऱ्या राजश्री शाहू महाराज शाळेत शालेय पोषण आहार शिजवणारी महिला आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयात साहित्य घेण्यासाठी गेले असता मुख्याध्यापक नरेंद्र अहिरराव यांनी तुम्ही शाळेत चोऱ्या करतात.तुम्हाला कामावरून काढून टाकले आहे.तरी देखील तुम्ही शाळेत का येतात.असे बोलून अश्चिल भाषेत शिवीगाळ करू लागले.याबाबत संस्थेचे महिला उपाध्यक्ष यांना बोलविले.त्यांनी मुख्याध्यापक यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता.त्यांनी त्यांच्या कानाखाली मारली.आम्ही त्यांना सोडवायला गेलो असता माझे दोन्ही हात पकडून ओरबडले व आम्हास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य मुख्याध्यापकांनी केले.महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक नरेंद्र अहिरराव यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.